*करकंब-सांगवी रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे...*!  *खड्डे बुजविण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे शासनाचे होते नुकसान*

*करकंब-सांगवी रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे...*!  *खड्डे बुजविण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे शासनाचे होते नुकसान*

 करकंब /प्रतिनिधी

:करकंब सर्वात मोठे गाव आहे. करकंब हे मध्यवर्ती गाव असल्याने करकंब गावाला येण्यासाठी आणि जाण्यासाठी सांगवी ते करकंब व करकम ते सांगवी या आठ किमी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडल्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या शेतकऱ्यांना सामान्य लोकांना शाळकरी विद्यार्थ्यांना आबाल वृद्धांना बालगोपाळांना विशेषता महिलावर्ग आणि त्यातच उपचारासाठी करकंब अथवा पंढरपूर सोलापूर टेंभुर्णी अकलूज इंदापूर या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्यावरून मोठी कसरत करावी लागते. करकंब येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत येत असलेल्या या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र या रस्त्यावर कुठे बुजवले की नाही की कागदावरच बुजवण्याचे दाखवल्याचे बोलले जात आहे .पण प्रत्यक्षात मात्र या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याने याचा प्रचंड मानसिक त्रास सामान्य लोकांना होत आहे. पंढरपूर तालुक्याचे संबंधित या रस्त्याबाबत व सुरू असलेल्या कामाबाबत अधिकारी हे वेळेला कधी सापडत नाही. ग्रामीण भागातील कामे मंजूर असताना रस्ते होत नाहीत, जे ग्रामीण भागात रस्ते सुरू होत आहेत ते अतिशय निकृष्ट पद्धतीने डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे.तसेच उत्कृष्ट पद्धतीने डांबरीकरण करण्याची आवश्यकता असताना तिथे थातूरमातूर रस्त्याचे काम करून दिवसाढवळ्या शासनाची लूट करून सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. यामुळे हे रस्ते लगेच  एक दोन महिन्यात  खराब होऊन जातात . या रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्ता राहत नाही. लहान मोठे खड्डे पडून रस्ता अत्यंत निकृष्ट पद्धतीचा होऊन लहान-मोठे अपघात घडून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना सामान्य लोकांना याचा प्रचंड मानसिक त्रास तर होतोच पण अशा निकृष्ट बनवलेल्या रस्त्यामुळे अनेकांचा बळी घेतला जातो. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच याकडे लक्ष देण्याची गरजआहे.


 करकंब ते सांगवी तसेच इतर ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या बाबत दिनांक 9/ 12 /2021रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकंब यांनी संबंधित ठेकेदाराला सांगूनही संबंधित ठेकेदार हाअधिकाऱ्यांना केराची टोपली दाखवून या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती आजपर्यंत केली गेली नाही ही मोठी शोकांतिका असल्यामुळे ग्रामीण भागातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.शासन रस्त्याच्या कामाच्या साठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते. शासनाने ग्रामीण भागातील रस्ते उत्कृष्ट दर्जाचे डांबरीकरण करून शहरी भागाला जोडण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला आहे .करत आहे. पण ठेकेदार आणि रस्ता हेच समीकरण बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. ठेकेदार व रस्ता हे समीकरण आले की वारेमाप पैसा लाटण्याचा धंदा आलाच त्यात रस्त्या संबंधित असलेले अधिकारी तरी मागे कसे राहतील तेही ठेकेदाराच्या अगदी बरोबरीने संगनमताने आपले हात ओले करून सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून कुठे खड्डे बुजवले कुठे तर डांबर टाकले असे थातुरमातुर निकृष्ट पद्धतीचे कामकाज करून हात ओले करून चक्क शासनाच्या पैशाची लूट करीत असल्याने जनताही म्हणते ओले ओले..ओ..ले तर अधिकारी म्हणतात झाले झाले.. अशी अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांची झाली असल्याने शासनाच्या निधीचा योग्य वापर करून उत्कृष्ट दर्जाचे रस्ते कधी होणार असे या ग्रामीण भागातून बोलले जाते. करकंब व मीन भागात खड्डे बुजवण्याच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांची लूट होत असल्याची चर्चा सामान्य नागरिकांतून होत आहे.


                                         चौकट

: करकंब ते सांगवी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले असून, याबाबतचे दिनांक 9 /12 /2021रोजी दुरुस्तीचे संबंधित ठेकेदारास पत्र दिले होते.
श्री. ई .एस. गुंड.
स्थापत्य अभियांत्रिकी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकंब.