*करकंब येथे महात्मा फुले जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी *

करकंब /प्रतिनिधी
करकंब ता. पंढरपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली आहे.
करकंब बस स्थानक येथे मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या प्रतिमेचे पूजन मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मृदुल माळी, भटक्या विमुक्त जाती संघटनेचे राज्याध्यक्ष मच्छिन्द्र भोसले, जिल्हा परिषद सदस्या रजनीताई देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब माळी, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच आदिनाथ देशमुख, पंचायत समिती सदस्य राहुल पूरवत, उद्योजक अमोल शेळके, अभिषेक पुरवत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव जाधव, कनकंबा ग्रुपचे अरुण बनकर, लक्ष्मण वंजारी, प्रा.सतीश देशमुख, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करकंब येथील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने रमेश बारसकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १५६ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी बारसकर यांनी देशांमध्ये ओबीसीची जनगणना झाली पाहिजे असा आग्रह धरून त्यासाठी सर्व ओबीसी समाजाने एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी आदिनाथ देशमुख रजनीताई देशमुख, मच्छिंद्र भोसले यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक विजयसिंह जाधव यांनी केले. सूत्रसंचालन बापूराव खांडेकर यांनी तर आभार रमेश खारे यांनी मानले.