*पंढरपूर बिल्डर असोसिएशनच्या चेअरमनपदी समाधान काळे यांची निवड* *आ. समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न.*

पंढरपूर /प्रतिनिधी
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया संलग्नित पंढरपूर सेंटरच्या चेअरमनपदी यशराज एंटरप्राइजेसचे प्रमुख समाधान काळे यांची एकमताने निवड करण्यात आली. पंढरपूर बिल्डर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर राज्याचे बिल्डर असोसिएशनचे चेअरमन जगन्नाथ जाधव सेक्रेटरी मनोज देशमुख, माजी चेअरमन दत्तात्रेय मुळे, पुणे सेंटरचे चेअरमन अजय गुजर, कार्यकारी अभियंता अमित निमकर, सोलापूर सेंटरचे चेअरमन संतोष कलकुटगी, युवा नेते प्रणव परिचारक युवराज चुंबळकर, क्रेडाई पंढरपूर चे चेअरमन अशिष शहा, माजी चेअरमन आर. बी. जाधव, कांतीलाल डुबल, माजी चेअरमन धनाजी बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.समाधान अवताडे म्हणाले की बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन कामाची उभारणी करताना जगभरातील नवीन आपल्या भागातील व्यवसायिकांना माहीत करून देणे हे अत्यंत महत्त्वाची बाब असोसिएशनच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे. कष्ट करत रहा कामातील आनंद हाच सगळ्यात मोठा आनंद असल्याचे सांगितले.
यावेळी पदग्रहण समारंभानंतर पंढरपूर बिल्डर असोसिएशनचे चेअरमन समाधान काळे म्हणाले की पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी होणाऱ्या शाश्वत विकासासाठी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने पुढील काळात कामकाज करणार असून तालुक्यातील अनेक बांधकाम व्यावसायिक त्याचबरोबर कुशल कामगार यांना सोबत घेऊन पंढरपूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी राज्याचे चेअरमन जगन्नाथ जाधव माजी चेअरमन दत्ता मुळे यांनी मार्गदर्शन केले.
पदग्रहण समारंभात पंढरपूर बिल्डर असोसिएशनचे चेअरमन म्हणून समाधान काळे, उपाध्यक्ष संजय साठे सचिव सुजित पाटोळे, सहसचिव सिताराम माने खजिनदार रणजीत लोंढे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक उद्योजक मुन्ना भोसले, विवेक साळुंखे यांनी असोसिएशनचे सभासदत्व स्वीकारले. नूतन पदाधिकारी व सभासदांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष संजय साठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार सहसचिव सिताराम माने यांनी मानले