*प्रधानमंत्री घरकुला बाबतीतील जाचक अटी कमी कराव्यात* *जनसेवा संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटोळे यांचा आंदोलनाचा इशारा*

*प्रधानमंत्री घरकुला बाबतीतील जाचक अटी कमी कराव्यात*  *जनसेवा संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटोळे यांचा आंदोलनाचा इशारा*

पंढरपूर (प्रतिनिधी)

सामान्य नागरिकास आकर्षित करणारी, प्रधानमंत्री घरकुल योजना लोकप्रिय झाली आहे. परंतु या योजने साठी असणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांनी केली आहे.


सर्वांना आपले घर असावे असे वाटणे साहजिक आहे. सहाजिकच याच धर्तीवर प्रधानमंत्री घरकुल योजना देशाच्या पंतप्रधानांनी राबविली आहे. ही योजना लोकप्रियही झाली आहे .परंतु या योजनेसाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्यात , अशी मागणी जनसेवा संघटनेच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांनी, पंढरपूरच्या प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे.


प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. ज्या घरात मोबाईल नाही , ज्या घरात पंखा नाही, अशा लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट केले जाते. मागील काही दिवसापासून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. यामुळे घराघरात मोबाईल पोहोचला आहे . याशिवाय प्रत्येक घरात लहान मुले, वृद्ध व्यक्ती असतात , यामुळे प्रत्येक घरासाठी पंखा असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या अटी  फ्रिज ,मोबाईल आणि दोन चाकी वाहने असणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून अलिप्त राहावे लागत आहे. ज्या घरात शासकीय कर्मचारी आहे , ज्या घरात पाच एकर बागायती जमीन आहे, ज्या घरात चार चाकी वाहने आहेत , अशा लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात यावे. टीव्ही , पंखा, फ्रिज, मोबाईल यासारख्या छोट्या छोट्या वस्तूंच्या जाचक अटी या योजनेत लादू नयेत. असे आवाहन जनसेवा संघटनेचे नेते अशोक पाटोळे यांनी केले आहे. १५ दिवसांच्या आत वरील गोष्टींचा विचार न केल्यास, जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल, असा इशाराही पाटोळे यांच्याकडून देण्यात आला आहे.