*जनता म्हणते... ओले..ओले...ओ...ले* *तर ठेकेदार-अधिकारी म्हणतात झाले.. झाले....!*

करकंब /प्रतिनिधी:
शासन रस्त्याच्या कामाच्या साठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते. शासनाने ग्रामीण भागातील रस्ते उत्कृष्ट दर्जाचे डांबरीकरण करून शहरी भागाला जोडण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला आहे .करत आहे. पण ठेकेदार आणि रस्ता हेच समीकरण बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. ठेकेदार व रस्ता हे समीकरण आले की वारेमाप पैसा लाटण्याचा धंदा आलाच त्यात रस्त्या संबंधित असलेले अधिकारी तरी मागे कसे राहतील तेही ठेकेदाराच्या अगदी बरोबरीने संगनमताने आपले हात ओले करून सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून कुठे खड्डे बुजवले कुठे तर डांबर टाकले असे थातुरमातुर निकृष्ट पद्धतीचे कामकाज करून हात ओले करून चक्क शासनाच्या पैशाची लूट करीत असल्याने जनताही म्हणते ओले ओले..ओ..ले तर अधिकारी म्हणतात झाले झाले.. अशी अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांची झाली असल्याने शासनाच्या निधीचा योग्य वापर करून उत्कृष्ट दर्जाचे रस्ते कधी होणार असे या ग्रामीण भागातून बोलले जाते.
संबंधित या रस्त्याबाबत व सुरू असलेल्या कामाबाबत अधिकारी हे वेळेला कधी सापडत नाही. ग्रामीण भागातील कामे मंजूर असताना रस्ते होत नाहीत, जे ग्रामीण भागात रस्ते सुरू होत आहेत ते अतिशय निकृष्ट पद्धतीने डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे.तसेच उत्कृष्ट पद्धतीने डांबरीकरण करण्याची आवश्यकता असताना तिथे थातूरमातूर रस्त्याचे काम करून दिवसाढवळ्या शासनाची लूट करून सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. यामुळे हे रस्ते लगेच एक दोन महिन्यात खराब होऊन जातात . या रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्ता राहत नाही. लहान मोठे खड्डे पडून रस्ता अत्यंत निकृष्ट पद्धतीचा होऊन लहान-मोठे अपघात घडून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना सामान्य लोकांना याचा प्रचंड मानसिक त्रास तर होतोच पण अशा निकृष्ट बनवलेल्या रस्त्यामुळे अनेकांचा बळी घेतला जातो. अशा बाबींकडे करकंब व ग्रामीण भागातील सामान्य जनता ,, दोन डझन हून अधिक जिल्ह्याचे असलेले पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.