*बेसुमार उत्खनन करणारे सद्गगुरू स्टोन क्रशर तात्काळ बंद करा* *आर.आर.पाटील लोकविकास प्रतिष्ठानची महसूल मंत्र्यांकडे तक्रार* *शासनाच्या महसुली वसुलीसाठी या प्रतिष्ठानचा  जोरदार पाठपुरावा* *महसुलच्या कुचकामी प्रशासनामुळे पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी घेतला जात आहे गैरफायदा*

*बेसुमार उत्खनन करणारे सद्गगुरू स्टोन क्रशर तात्काळ बंद करा*   *आर.आर.पाटील लोकविकास प्रतिष्ठानची महसूल मंत्र्यांकडे तक्रार*  *शासनाच्या महसुली वसुलीसाठी या प्रतिष्ठानचा  जोरदार पाठपुरावा*  *महसुलच्या कुचकामी प्रशासनामुळे पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी घेतला जात आहे गैरफायदा*

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील महसूल विभागातील कुचकामी प्रशासनाचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे उतखनन केले गेले आहे. परंतु याकडे कारवाई करून दंड वसुलीसाठी दुर्लक्ष होत आहे. अशा अनेक ठिकाणी असलेल्या खडी क्रेशरसह  शेवते येथील सद्गगुरू स्टोन क्रेशर या नावाने उभारण्यात आलेले , दोन्ही स्टोन क्रेशर तात्काळ बंद करा ,अशी मागणी आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी, राज्याचे महसूल मंत्री, महसूल आयुक्त यांचेकडे केली आहे. या प्रकाराने पंढरपूर तालुक्यातील गौणखनिज घोटाळ्याचे गुपित आणखीनच वाढले आहे.


पंढरपूर तालुक्यातील शेवते हे गांव स्टोन क्रशरसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ७० ते ८० परवाना तसेच विनापरवाना स्टोन क्रशर सुरू आहेत. येथील गट नंबर १८ तसेच गट. नं. ३२८/१/अ मध्ये दोन स्टोन क्रशर उभारण्यात आले आहेत. हे दोन्ही स्टोन क्रेशर, भारत वैजिनाथ कोरके हे चालवीत आहेत . जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असणाऱ्या या दोन्ही स्टोन क्रेशरद्वारे, या ठिकाणी बेसुमार मुरूम तसेच दगडाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून, भूसुरुंग स्फोट घडवून लाखो ब्रास मुरूम आणि दगडाचा उपसा करण्यात आलेला आहे .अशा प्रकारे बेसुमार उत्खनन करून , भारत कोरके यांनी सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल दिवसाढवळ्या राजरोसपणे बुडविला असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी तात्काळ लक्ष घालून, संबंधित दोन स्टोन क्रशर तात्काळ बंद करावेत ,आणि तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी न झाल्यास, पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

यासंबंधीची निवेदने विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर,
उपविभागीय अधिकारी पंढरपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर तसेच पंढरपूरच्या तहसीलदारांना देण्यात आली आहेत.


चौकट

पंढरपूर तालुक्यातील शेवते येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सद्गुरू स्टोन क्रेशर या नांवे दोन स्टोन क्रेशर सुरू आहेत. भारत वैजिनाथ कोरके हे या स्टोन क्रेशरचे मालक आहेत. जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून, या स्टोन क्रशर मार्फत बेसुमार अवैध मुरूम आणि दगडाचा उपसा करण्यात आला असल्याची तक्रार आर.आर.पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे. हे दोन्ही क्रेशर तात्काळ बंद करावेत आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकाराने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 तसेच ज्या ठिकाणी दिलेल्या तक्रारीवरून  काही ठिकाणचे जे पंचनामे करून ठेवले आहेत, त्याची तात्काळ अंमलबजावणी करून ,संबंधितांवर शासकीय नियमानुसार दंड आकारून तो सक्तीने वसूल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.