*हमाल कामगारांचे पगार त्वरीत करा - जिल्हाध्यक्ष शिंदे* *जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांना निवेदन;* *जिल्ह्यातील 5 हजार कामगारांचा निघणार मोर्चा*

। पंढरपूर, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे या पंढरपूर येथील आनवली गावातील शासकीय धान्य गोदामाच्या उद्घाटनास आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानास भेट देत असताना त्या गादेगाव येथे आल्या त्यावेळी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समितीचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस शिवाजीराव शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शासकिय धान्य गोदामातील हमाल कामगारांच्या थकित बिलाचे निवेदन देत असताना हमाल कामगारांचे पगार त्वरीत करण्याची मागणी केली.
सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हापुरवठा अधिकारी वर्षा लांडगे या पंढरपूर दौर्यावर आल्या असता जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, जिल्हा सचिव संतोष सावंत, पंढरपूर हमाल पंचायतचे अध्यक्ष सिध्दनाथ ढोले यांनी गादेगाव येथे त्यांचे भेट घेवून, त्यांचे स्वागत करून जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांची गेल्या दोन वर्षांपासून थकीत असणारे पंतप्रधान मोफत अन्नधान्य योजनेची बिले व रेग्युलर बिले त्वरीत आदा करावीत व त्यांच्यावर होत असणारी उपसमार लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी केली. त्यांनतर जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी लवकरच बिले आदा करण्याचे अश्वासन दिले.
जिल्ह्यातील शासकिय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे पगार त्वरीत करावे त्याच प्रमाणे जिल्ह्यातील नोंदीत कामगारांनाच विविध ठिकाणी हमाल व तोलारांना मिळावेत. ठेकेदारी पध्दत बंद व्हावी. व जिल्ह्यात हमाल कामगारांची होत असणारी पिळवणुक थांबावी यासाठी ऑक्टोंबर मध्ये सोलापूर जिल्ह हमाल मापाडी मापाडी श्रमजिवी कामगार समिती व जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर व जिल्हा पुरवठा कार्यालयावर जिल्ह्यातीलविविध ठिकाणी काम करणार्या पाच हजार कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.