*आमदार समाधान दादा आवताडे यांच्या उपस्थितीत प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थे मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.*

पंढरपूर:-प्रतिनिधी
राजयोगिनी दादी यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पंढरपूर यांच्यावतीने मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर-मंगळवेढा चे लोकप्रिय दमदार आमदार समाधान दादा आवताडे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पंढरपूर शहर चे कर्तव्यदक्ष पी आय अरुण पवार साहेब हे होते. या कार्यक्रमामध्ये आमदार समाधान दादा आवताडे यांना राखी बांधून औक्षण करून यथोचित सन्मान करण्यात आला. या सत्कारास उत्तर देताना आमदार महोदयांनी सांगितले की आज बहिणीने भावाला राखी बांधली हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय आहे, या प्रसंगी त्यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या मायेची सावली आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव रहवा. या प्रसंगी कुंभार गल्ली रस्त्याच्या मागणीवरून बोलताना त्यांनी सांगितले शहरातील एकही रस्ता अपूर्ण ठेवणार नाही. असे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या उज्वला दीदी , स्वाती दीदी, वैष्णवी दीदी व त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे योगदान ठरले. याप्रसंगी उपस्थित श्री विनोद लटके, दत्ता काळे (महाराज), भैय्यासाहेब कळसे , बंटी वाघ , शहाजी शिंदे, पांडुरंग वाडेकर, राहुल गावडे, ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब दुधाळे, अविनाश मोरे सर, जनसंपर्क कार्यालय प्रमुख बालम मुलाणी साहेब इतर मान्यवर उपस्थित होते.