*युवकांनी सामाजिक बांधीलकीचे भान जापासावे ः भोसले* *मेंढापूर येथे अभ्यासिकेच्या उद्घाटनाने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन* ः

*युवकांनी सामाजिक बांधीलकीचे भान जापासावे ः भोसले* *मेंढापूर येथे अभ्यासिकेच्या उद्घाटनाने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन* ः

 ः
 प्रतीनिधी/पंढरपूर
आजच्या समाजमध्ये अनेक अनिष्ठ रूढी व परंपरा निर्माण होत असून समाजातील वाढती व्यसनाधीनता व अविचारी दृष्टीकोन समाजाला घातक ठरत आहे. यामध्ये समाजातील युवक फरफटत चालला आहे. त्यामुळे सामाजिक विकासाचे भवितव्य अंधारमय झाले आहे. हे सर्व थांबण्यासाठी महापुरूषांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या  विचार चळवळीचे  पाईक होवून युवकांनी सामाजिक बांधीलकी जोपासली पाहीजे. असे प्रतिपादन  व्याख्याते भगवान भोसले यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक तरूण मंडळाच्या जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजीत अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी  अध्यक्षस्थानावरून भोसले बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करून सध्या समाज सुधारणेमध्ये युवक वर्गाचा महत्वपुर्ण सहभाग आसला पाहीजे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच दिलीप कोरके, सरपंच विनोद पाटोळे , ग्र.प.सदस्य रावसाहेब पवार, तलाठी दादासाहेब पाटोळे , ग्रमसेवक सचिन खरात , ऍड .अमर पवार, सागर पवार, महावीर नागणे, उद्योजक अशिष पवार, डॉ .संतोष नागणे, देवीदास पवार, धनाजी पवार, गणेश ढोणे, सोमनाथ गोरे, शिवाजी पाटोळे  , मंडळाचे अध्यक्ष अभिजीत शिंदे, उपाध्यक्ष अतुल वाघमारे, खजिनदार अविनाश झेंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी  उपस्थित मान्यवरांनी अपल्या मनोगतातून मंडळाने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या संकल्पनेचे कौतुक करून हेच खर्या अर्थाने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन असल्याचे सांगितले. तर यासाठी अवश्यक सेवा सुविधांसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस पाटील सचिन शिंदे यांनी केले. तर अभार महादेव शिंदे यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक तरूण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी  परिश्रम घेतले.

अभ्यासिकेची संकल्पना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी....
विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक तरूण मंडळाच्या वतीने  राबविण्यात आलेल्या अभ्यासिकेची संकल्पना महत्वपुर्ण असून यातुन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळणार आहे. या अभ्यासिकेसाठी ग्रमपंचायतीचे सहकार्य लाभले आहे. तर तलाठी दादासाहेब पाटोळे  व आरटीओ आतुल नागणे यांनी पुस्तके देण्याचे सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. यामुळे  कार्यक्रमाप्रसंगी  त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले.