*भावी आमदार -रणजीत सिंह यांचा झंझावती गाव भेट दौरा....!* *गावभेट दौऱ्यात अडीअडचणी घेतल्या जाणून... फोन करून केल्या सूचना.*

*भावी आमदार -रणजीत सिंह यांचा झंझावती गाव भेट दौरा....!*   *गावभेट दौऱ्यात अडीअडचणी घेतल्या जाणून... फोन करून केल्या सूचना.*


करकंब/ प्रतिनिधी 

माढा -पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील करकंब सह परिसरातील 42 गावात सध्या भावी आमदार , सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य-रणजीत सिंह शिंदे यांचा भोसे, शेवते, पटवर्धन कुरवली, आव्हे, तरडगाव, उजनी वसाहत, नेमतवाडी, नांदोरे, नेवरे विविध गावांमध्ये झंजावती गाव भेट दौरा झाला असून या गाव भेट दौऱ्यामध्ये लोकांच्या अडीअडचणी व लोकांशी थेट संपर्क साधत असल्याने या गाव भेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
         नाऺदोरे, ता - पंढरपूर येथे  गुरूवार दि. २/०३/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जि.प.सदस्य मा.श्री. रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी गावभेट दौऱ्यात ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे रस्ते, वीज,ऊस व इतर अडीअडचणी जाणून घेतल्या .काही अडचणी संदर्भात अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या. व राहिलेल्या अडचणी टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.तसेच त्यांनी सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या दुध संकलन वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
         या गाव भेट दौऱ्यामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक -पोपट (मामा) चव्हाण ,‌ सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष-गणेश पाटील, महेश खटके, जिल्हा परिषद सदस्य- अतुल खरात , मोहन तळेकर, जयवंत गावंधरे, मारुती कोरके, सोलापूर दूध संघाचे संचालक -बाळासाहेब माळी,विठ्ठल चे माजी संचालक- दशरथ खळगे,  मा. सरपंच- कुंडलिक खळगे, धनंजय तळेकरविठ्ठल कारखान्याचे माजी संचालक राजाराम (दाजी) भिंगारे, पांडुरंग चे माजी संचालक शिवाजी साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सत्यवान कारंडे, शरद भिंगारे, माजी सरपंच मारुती भिंगारे, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक कांतीलाल भिंगारे, रामचंद्र वाघ ,उपसरपंच महावीर कदम , उपसरपंच- कुंडलिक उलभगत, माणिक पाटील, अभिजीत पाटील, रामचंद्र पाटील, श्रीमंत वाघमोडे,विलास साळुंखे ,संतोष वलगे , सचिन कदम, मा.सरपंच युवराज भिंगारे, मा. सरपंच -बिटु करवर , तंटामुक्ती अध्यक्ष-दत्ता नाना बनसोडे, लहू यमगर, मारुती भुसणर,शेती अधिकारी इंगोले साहेब , दूध संकलन अधिकारी नाईकनवरे साहेब यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.