*करकंब  जिल्हा परिषद गटासह 42 गावाकडे  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची निर्णयाक भूमिका.....!*

*करकंब  जिल्हा परिषद गटासह 42 गावाकडे  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची निर्णयाक भूमिका.....!*

 
: *करकंब/ प्रतिनिधी*

:-नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये माढा -पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आमदार व जिल्हा परिषद सदस्य रणजीत सिंह शिंदे यांची सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण न आणता सर्वसमावेशक आघाडी निर्माण करण्याचे जिल्ह्याचे नेते यांनी भूमिका घेऊन  माढा पंढरपूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार बबनदादा शिंदे व शिवसेनेचे माजी आमदार दिलीप सोपल यांच्याकडे नेतृत्वाची धुरा दिली  होती. त्यातही या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक  मंडळाच्या मध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या रूपाने त्यांच्या सुन वैशाली साठे यांना अखेरपर्यंत संधी मिळेल अशी अपेक्षा असूनही मात्र चक्क जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा पत्ता कट केल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या सुन वैशाली साठे यांना या दूध संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची वेळ आली. सोलापूर दूध संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी खुद्द जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांना ही इंटरनॅशनल टोळी असून आपण संपू पण ही इंटरनॅशनल संपणार नाही असे सुतोवाच त्याच वेळी केले होते. असे असले तरी यातूनच या सोलापूर दूध संघाच्या संघाच्या निवडणुकीमध्ये इतर उमेदवारापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या सुनबाई वैशाली साठे यांना सर्वाधिक इतर उमेदवारापेक्षा 55 मते अधिक जास्त मिळाली आहेत. यामध्ये त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला असला तरी याचे शल्य मात्र सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्या मनात कायम घर करून राहिले असून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विधानसभा या प्रत्येक निवडणुकीत आता बळीराम काका साठे यांनी यां करकंब जिल्हापरिषद गटासह 42 गावातील माढा-पंढरपूर मतदार संघातील प्रत्येक पदाधिकारी ,कार्यकर्ते, बुथ कमिटी, स्थानिक पातळीवर लोकांशी सातत्याचा संपर्क ठेवून याबाबत गुप्त खलबते सुरू असल्याची चर्चा चालू असल्याचे खात्रीलायक वृत्त  आहे. काही झाले तरी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.या याबाबत स्वतः स्थानिक पातळीवर येऊन जिल्हा दूध संघाचे शल्य आगामी काळात यानिमित्ताने दिसून येणार असल्याचे राजकीय जाणकार आतून बोलले जात आहे.*
: *सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या दररोजच्या होणाऱ्या गुप्त बैठकांमुळे करकंब जिल्हापरिषद गटासह 42 गावातील तसेच माढा पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बळीराम काका साठे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे.*