: *नाथा.... कसे येऊ आता...* *संत एकनाथ महाराज पालखी मार्ग.. अस्वच्छता व घाणीच्या साम्राज्यात.....!*

करकंब /प्रतिनिधी
:- आषाढी एकादशी सोहळ्यासाठी करकंब येथे मुक्कामी येत असलेल्या संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज त्याचबरोबर असंख्य संतांच्या पालख्यांचा सोहळा आणि या सोहळ्यासोबत असलेले लाखो वारकरी भाविक भक्त... करकंब नगरीत दरवर्षी येत असतात. अगदी काही तासावर येऊन ठेपलेला हा सोहळा आला तरी प्रशासनाला अजून जाग येईना... या येणाऱ्या संतांच्या पालखी मार्गावर त्यातच पालखी मुक्कामी आणि गावातील अंतर्गत असलेल्या भागात प्रचंड घाणी चे साम्राज्य आणि अस्वच्छता पसरल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनातील अधिकारी मात्र गेली आठ दिवस पालखी तळाला मार्गाला नुसत्याचं भेटी देऊन नुसताचं दिखावा करत असल्याचे बोलले जात असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. गावाला कारभारी सतरा.... अशी म्हणण्याची वेळ करकंबकरांवर आली असून गेल्या आठ दिवसापासून हे ग्रामपंचायतचे प्रशासन व संबंधित पालखी मार्गाचे प्रशासनातील अधिकारी करतात तरी नेमके काय...? पालखी व दिंडी सोहळा गावात अवघ्या काही तासावर आला तरी यांचे नियोजनच सुरू असल्याचे दिसून येत असल्याने आंधळं दळतयं.... कुत्रं पीठ खातय.... अशी अवस्था झाली आहे. आजही अनेक पालखी मार्गावर .. तळावर घाणचे साम्राज्य.. अस्वच्छता... वीज.. शुद्ध पाणीपुरवठा, आरोग्य त्यातच गावातील व गावाबाहेरील असलेली हॉटेल्स किराणा व इतर छोटे- मोठे उद्योग व्यवसायांच्या बाबतअन्न औषध प्रशासनाकडून दक्षता घेतली आहे की काय..? याची ग्रामपंचायत प्रशासनाने कोणते नियोजन केले. गावकऱ्याचे सोडा किमान आलेल्या पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी भाविक भक्तांची तरी दक्षता अथवा काळजी..? घेण्यासाठी याबाबतीत प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या....? आहेत. त्यातच या पालखी मार्गावर विशेषता लगतचं असलेल्या परमिट रूम बियर बार च्या बाबत प्रशासनाने कोणती भूमिका घेतली..? आषाढी एकादशीच्या धर्तीवर परमिट रूम अँड बियर बार व इतरही अवैध धंदे या पालखी सोहळ्यानिमित्ताने बंद करण्याबाबत प्रशासनाने काय भूमिका घेतली....? याबाबत ग्रामस्थातून चर्चा होत आहे. असे असले तरी किमान यातील प्रशासन एकातरी प्रश्नाची सोडवणूक करणार का...! याकडे गावाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी करकंब व पंचक्रोशीत नयनरम्य वैष्णवाचा भक्तिमय महामेळावा भरलेला असतो. अशावेळी करकंब नगरी अवघ्या विठू नामाच्या जयघोषाच्या
नामाने दुमदुमलेली असते. अनेक साधुसंतांच्या पालख्या दिंडी सोहळा करकंब गावात मुक्कामी असल्याने अनेक लाखो वारकरी भाविक- भक्त करकंब विसाव्यासाठी थांबलेले असतात. श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने श्रीहरीच्या जयघोषात या संतांच्या पालख्या करकंब येथे मुक्कामी असल्याने करकंब सह पंचक्रोशीतील असंख्य महिला ,विशेषता बालगोपाळ वयोवृद्ध आणि भाविक- भक्त भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी येत असतात.
परगाहून आलेल्या असंख्य पालख्या दिंड्या- पालख्या सोहळा त्यातच करकंब व पंचक्रोशीतील असलेले असंख्य भाविक -भक्त त्यामुळे गावातील असणारे पालखी मार्ग अंतर्गत रस्ते ,विजेची व्यवस्था, आरोग्य, या बाबीकडे विशेष लक्ष देण्याचे गरजेचे असताना आजही हा भक्तिमय मार्ग भक्तांच्या दर्शनासाठी मात्र खडतर बनतं चालला आहे. शासनाने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अनुदानाप्रमाणे एक महिना अगोदर करकंब येथील महत्वपूर्ण असलेल्या सर्वच पालख्यांची शासन दरबारी नोंद घेऊन त्याप्रमाणे निधीची तरतूद करून आलेल्या असंख्य व लाखो वारकरी भाविक भक्तांची गैरसोय होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे. मागणी कितीतरी वेळा करूनही गेल्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर अद्याप या पालखी मार्गावरील व पालखी विसावाच्या ठिकाणी अनुदान प्राप्त न झाल्याने स्थानिक ग्रामपंचायत मात्र या साठी खर्च करत नाही. जोपर्यंत शासन अनुदान मिळत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायत व प्रशासन ही बघ्याची भूमिका घेत असल्याने आलेल्या वारकऱ्यांचे मात्र हाल होत असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या पालखी मार्गावरील पालखी सोहळ्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्यास या पालखी मार्गावरील असलेली गैरसोय निश्चित दूर होईल आणि या पालखी मार्गावर पालखी तळावरील व मुक्कामी असलेल्या पालखी ठिकाणी संबंधित प्रशासनातील सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित असल्यास असलेल्या अडचणी आणि गैरसोयी निश्चितपणाने दूर होतील व श्री विठ्ठलाचा भक्तिमय मार्ग निश्चितपणाने सुकर होण्यास शासनाचा हातभार लागेल असे बोलले जात आहे.
: *चौकट*
*शासनाच्या भाविक भक्तांचे सोयीसुविधांसाठी आलेल्या निधीतून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा तपशील जनतेसमोर मांडून भावी भक्तांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन, स्थानिक व्यापारी व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय राखून बैठक आयोजित करणे गरजेचे आहे. परंतु असे न होता येथील प्रशासकीय अधिकारी हे मात्र स्वतःच तोऱ्यात मिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.*