राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पंढरपूर तहसिलदार यांना निवेदन*

पंढरपूर / प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तात्काळ ओबीसी जनगणना डाटा सादर करावा व आरक्षण पूर्ववत लागू होणेकामी कार्यवाही व्हावी तसेच ओबीसींच्या इतर मागण्यांचे निवेदन आज दि. २४ जून २०२१ रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बारा बलुतेदार संघटनेचे नेते- पंढरपूर परीट धोबी सेवा मंडळाचे शहर अध्यक्ष व पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक मा श्री विजय वरपे यांनी ओबीसी बांधवांना सोबत घेऊन पंढरपूर चे तहसीलदार यांना दिले.
ओबीसींच्या मागण्यांबाबत शासनाने दिरंगाई केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे श्री.विजय वरपे यांनी सांगितले.
यावेळी परीट धोबी सेवा मंडळ पंढरपूर तालुका अध्यक्ष मा श्री गणेश दादा ननवरे, युवक शहर अध्यक्ष मा श्री रामेश्वर सांळुखे आदी उपस्थित होते.