*करकंब मधील नागरिकांकडून होतेय विचारणा* *कोणी रस्ता देता का रस्ता?*

करकंब हे गावं पंढरपूर तालुक्यामध्ये लोकसंख्या व भौगिलीक दृष्ट्या १नंबरचे गाव आहे, करकंब गावामध्ये मोठ्या प्रमाणात बँका, पतसंस्था ,पोलीस स्टेशन, हायस्कूल ,महाविद्यालय व मोठी बाजारपेठ आहे .त्यामुळे करकंब गावाशेजारील खेड्यांचा करकंबशी सतत संपर्क असतो, त्या प्रमाणातच वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते .करकंब गावामधील रस्त्यांवर्ती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यातील पाण्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत .पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे .वास्तविक पाहता रस्ते व रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. परंतु त्या निधीचे योग्य ते नियोजन न केल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे दिसून येते .त्यामुळे सामान्य नागरिक व वाहनचालकांना मनस्ताप होत आहे.
करकंब व करकंब मध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या प्रमाणातच वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते .करकंब मध्ये येणारे बाहेरगावचे लोक तुमच्या गावचे रस्ते असे का आहेत? त्या प्रश्नांचे उत्तर देणे करकंब मधील नागरिकांना देता येत नाही .रस्त्यांची अवस्था अशी आहे तर आरोग्य, स्वच्छता ,पाणीपुरवठा, शिक्षण यांची काय परिस्थिती असेल? असा प्रश्न त्यांना पडतो .आमची छोटी छोटी गावे असूनही अंतर्गत रस्ते चांगल्या प्रकारचे आहेत मग तुमचे गाव एवढे मोठे असून रस्त्यांची अवस्था अशाप्रकारे का आहे ? या प्रश्नाचे उत्तर करकंबमधील नागरिकांकडे नसते
तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करून ते व्यवस्थित करावेत .अशा प्रकारची मागणी करकंब मधील नागरिक व विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.