*निशिगंधा बँकेस रू. २४.२७ लाखांचा नफा, सभासदांना ५% लाभांश.- चेअरमन,कल्याणराव काळे*

पंढरपूर - प्रतिनिधी
निशिगंधा सहकारी बँकेने सभासद व ठेवीदारांची विश्वासार्हता जपत समाधानकारक प्रगती केली आहे. बँकेच्या व्यवहारात वाढ झालेली असून, भाळवणी (ता पंढरपूर) येथील शाखेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बँकेस सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात रू.२४.२७ लाखांचा नफा झाल्याचे सांगून सभासदांना रिझर्व बैंक आफ इंडियाच्या परवानगीने ५ % लाभांश सभासदांचे खातेवर जमा केल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन् आर. बी. जाधव, संचालक देविदास सावंत, बी. बी. सावंत, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. मंदार सोनवणे, सतिश लाड, भागवत चवरे, विवेक कबडे, ॲड. सौ. क्रांती कदम, श्रीमती शोभा लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिर्के, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
*निशिगंधा बँके कडे सध्या बँकेकडे ३१.०६ कोटी रूपयांच्या ठेवी असून, रू. १९ कोटींचे कर्जवाटप केलेले आहे व रू. १०.९३ कोटींची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेताना काळे म्हणाले कि, बँकेने २०२०-२१ या वर्षात ४६.९९ कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. मार्च २०२१ अखेरच्या आर्थिक वर्षात बँकेस २४.२७ लाखांचा नफा झालेला असून सभासदांना ५% लाभांश देणार असल्याचे काळे यांनी सांगितले.*
नियमीत कर्ज भरणाऱ्या सभासदास व्याजात २% सूट देण्यात येत आहे, याचा सर्व सभासदांनी फायदा घ्यावा, तसेच सी. टी. एस. चेकबुक, आरटीजीएस, एनएफईटी, ई -पेमेट, एसएमएस बैंकिंग तसेच देशातील विविध शहरांवर डी.डी., सोनेतारण कर्ज, शाखा भाळवणी येथे सेफ डिपोझिट लॉकर्स ची सोय इ. सेवा बँक देत असून लवकरच स्वमालकिच्या इमारती बरोबरच आधार लिकिंग पेमेंट सिस्टीम, एटीएम या सेवाही देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे काळे म्हणाले.