*मानव अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कुमार ढवळे*

*मानव अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कुमार ढवळे*

पंढरपूर (प्रतिनिधी)

मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते कुमार ढवळे यांची निवड नुकतीच करण्यात आली. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मोहोळ येथील प्रशिक्षण शिबिरात , ही निवड करण्यात आली. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्याकडून ढवळे यांना, त्यांच्या निवडीचे  पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी या संघटनेचे राज्यातील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली, मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे काम देशात मोठ्या जोमाने सुरू आहे . मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते कुमार ढवळे यांची, या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली . कुमार ढवळे हे ना. आठवले यांच्या सुरुवातीच्या काळापासूनच, त्यांचे समर्थक आणि सहकारी आहेत. यापूर्वी त्यांनी या संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत, त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. मोहोळ येथे या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात इतर काही पदाधिकार्‍यांच्या निवडीही करण्यात आल्या. यावेळी या संघटनेचे पदाधिकारी सुधीर सोनटक्के, शशिकांत ठोकळे, संजय शिवशरण, तुकाराम कोळी , हरीश देखणे, विष्णू भोसले, मनीषा राऊत, सुजाता भाटे, दीपक ओहोळ, संजय आठवले, किरण सूर्यवंशी, मिलिंद वैद्य, शांतीसागर भुसारी यांच्यासह, संघटनेचे इतर पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.