*उद्या रविवारी कसेगावलाच होणार राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक* *बैठकीसाठी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांचे आवाहन!*

*उद्या रविवारी कसेगावलाच होणार राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक*  *बैठकीसाठी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांचे आवाहन!*

पंढरपूर:-प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी यांची आढावा बैठक तालुक्यातील कासेगाव येथे रविवारी दि12 सप्टेंबर रोजी सकाळी11वाजता होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.
    या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठेहे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत  जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील,विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  वरील सर्व मान्यवर नेतेमंडळीच्या उपस्थितीत होणाऱ्या या तालुक्यातील आढावा बैठकीला पंढरपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वेळेवर  कासेगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमूख यांनी केले आहे