*स्व.आ.भारतनाना भालके यांना खरे परिवाराकडून श्रद्धांजली* *उद्योजक राजू खरे यांचे आ.भालके यांच्याशी होते जिव्हाळ्याचे संबंध*

पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे कष्टकरी जनतेचा आधार, लोकनेते स्व. आ. भारतनाना भालके यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे भावी आमदार उद्योजक राजू खरे यांच्या परिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
तालुक्यातील सरकोली येथे मंगळवारी पुण्यतिथीनिमित्त फुले टाकण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यासह इतर भागातून हजारो लोकांनी उपस्थित राहून स्व. भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी स्वतः राजू खरे हे सद्या मुंबई येथे असल्याने खरे यांच्या परिवाराचे वतीने पत्नी सौ.तृप्तीताई खरे , सौ.सूनिताताई संजय मस्के ताई., त्यांचे लहान बंधू -विजूभाऊ खरे, राजेंद्र चंदनशिवे सर,समाधान बाबर लखन वाघमारे,सोनुदादा शिंदे, यांच्यासह राजू खरे स्नेह परिवारमधील अनेक जणांनी श्रद्धांजली वाहिली.
चौकट
*भालके आणि खरे यांचा स्नेह जुनाच..!*
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आ. भारतनाना भालके आणि उद्योजक राजू खरे यांचा स्नेह जुनाच होता. अगदी आमदार होण्याच्याही पूर्वीपासून सलोख्याचे संबंध होते. त्यातच आमदार झाल्यावर मतदार संघातील कामानिमित्त आ.भालके मुंबईला जात होते. त्यावेळी मंत्रालय आणि इतर ठिकाणी कायम राजू खरे यांचा संपर्क होत होता. त्यावेळी आपल्या भागातील विकास कामावर कायम चर्चा होत होती. त्यामुळे आमचे खरे आणि भालके यांचे संबंध जुनेच होते. असेही राजू खरे यांनी सांगितले आहे.