*सहकार शिरोमणीच्या व्हाईस चेअरमनपदी मोहनबापू नागटिळक**प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे यांच्या हस्ते सत्कार*
पंढरपूर /प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर-भाळवणी, ता. पंढरपूर या कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. मोहन (बापु) नागटिळक यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थचे चेअरमन विलासराव वसंतराव काळे यांच्या हस्ते पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी स.शि.वसंतराव काळे सह.सा.का.लि. चे संचालक बाळासाहेब माने, नवनाथ पोरे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थचे व्हा.चेअरमन हरिदास मुजमुले, संचालक पांडुरंग कौलगे, रमेश नागणे, रामचंद्र पाटील, प्रकाश गायकवाड, इब्राहीम मुजावर, तानाजी केसकर, संजय पाटील, युवराज मोरे, सोबत पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्री. मोहन वसंत नागटिळक यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. नागटिळक यांच्या निवडीमुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या प्रगतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.