*सपोनि निलेश तारू यांचा दिव्यांग नी केला विशेष सन्मान.

करकंब /प्रतिनिधी:
3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग (अपंग) दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक दिव्यांग (अपंग) दिनाचे औचित्य साधून दिनांक 3 रोजी करकंब तलाठी कार्यालय ते करकंब ग्रामपंचायत या ठिकाणापर्यंत दिव्यांग जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता.
करकंब येथे 54 ऑनलाईन दिव्यांग अंध अपंग अस्थिव्यंग मूकबधिर कर्णबधिर आदी दिव्यांग असल्याने पोलीस प्रशासन त्याबाबत मानवतेची व सहानुभूतीची भूमिका घेत असल्याने या सर्व दिव्यांगा मधून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे त्यांना येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाताना प्रत्येक विभागातील पदाधिकारी व अधिकारी त्यांच्या भूमिका समजून काम करीत असल्याने करकंब प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व करकंब पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे व करकंब पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दिव्यांगा बद्दल असलेली मानवता व सहानुभूती दाखवून पोलिसांनीही दिव्यांगा बद्दल असलेली आजच्या युगात माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे विशेष आभार लेखी पत्राद्वारे करकंब संघटनेच्या लेखी पत्राद्वारे माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक करकंब पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.