: *करकंब च्या शेतकऱ्यांची उडाली झोप.... निसर्गाने केला कोप...*.!  *निसर्गाने केला कहर त्यामुळे करकंब सह परिसरातील द्राक्ष बागा संपुष्टात.

: *करकंब च्या शेतकऱ्यांची उडाली झोप.... निसर्गाने केला कोप...*.!  *निसर्गाने केला कहर त्यामुळे करकंब सह परिसरातील द्राक्ष बागा संपुष्टात.


 करकंब /प्रतिनिधी:

करकंब हे पूर्वीपासून द्राक्ष फळबागेसाठी सुप्रसिद्ध होते व आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकरी वर्ग द्राक्षे शेतीकडे प्राधान्याने लक्ष देऊन करकंब ची द्राक्षे परदेशाच्या बाजारपेठेत निर्यात करत होत होते . करकंब हे द्राक्ष निर्यातीबाबत अग्रेसर असल्यामुळे त्यावेळी करकंब द्राक्ष बागायतदार संघ स्थापनही करण्यात आला. देशाचे माजी कृषिमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री शरद चंद्र पवार , माझी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे राज्यामध्ये निर्यातक्षम द्राक्षनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या करकंब मध्ये आले होते. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात द्राक्ष फळबागेची लागवड या भागांमध्ये करण्यात आली.परंतू कालांतराने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने द्राक्ष पिकांना पाण्याची कमतरता भासू लागल्याने अनेक शेतकऱ्यांना द्राक्ष फळबाग  वर कुऱ्हाड मारावी लागली. आणि आणि द्राक्ष फळबाग शेती करणारा शेतकरी इतर पिकाकडे शेती करू लागला. परंतु या भागातील शेतकरी शेतीच्या पाण्यासाठी बेचैन होता . त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची कर्जे काढून नदीवरून  कॅनल वरून पाईप लाईन करून पाण्याचे स्तोत्र निर्माण करून पुन्हा द्राक्ष शेती उभारली. व या द्राक्ष शेतीतून बेदाणा निर्मितीचे प्रयोग सुरू केला. कसातरी हातभार लागत असतानाच निसर्गाने मात्र कहर केला .आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यांची झोप उडवून  गेला. हातातोंडाशी आलेला घास गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या बदलत्या निसर्गाच्या वातावरणामुळे करकंब आणि परिसरातील सुमारे 70 ते 80 टक्के द्राक्षबागा संपुष्टात आल्या. निसर्गाने झोडपले, राजाने मारले आता सांगायचे तरी कोणाला अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. दररोज लाखो रुपयाची महागडी औषधे फवारणी करूनही हाती काहीच लागणार नाही . अजून निसर्गाचा कहर थांबता थांबत नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला आहे.
    करकंब व परिसरातील शेतकऱ्यांनी सोनाका  ,माणिक चमन, थामसन, क्लोम या द्राक्ष रोपांची लागवड करून फळबागा तयार केल्या. यामध्ये सोनाका माणिक चमन थामसन या द्राक्षे फळबागांची निवड करून त्यांना वेळोवेळी पाणी औषध फवारणी छाटणी फळबाग वाढवली. या द्राक्ष बागेची छाटणी ही दिनांक 7 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर झालेली असल्याने अनेक द्राक्ष बागा ह्या फ्लोरिंग मध्ये आलेल्या असल्याने त्यातच गेल्या पंधरा दिवसापासून निसर्गाने कहर केल्याने सातत्याने पाऊस ढगाळ हवामान यामुळे शेतकऱ्यांना दररोज महागडी औषधे घेऊन द्राक्ष बागेत फवारणी करावी लागत आहे. द्राक्ष फळ गळू नये दावणी , फळकुद  साठी वेगवेगळी महागडी औषधे याची फवारणी करावी लागत आहे. साधारणता एकरी तीन ते पाच हजार खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. करकंब व परिसरामध्ये सुमारे तीन तीन ते साडे तीन हजार एकर द्राक्षे फळबागा असून यातील 70 ते 80 टक्के बागा या निसर्गाच्या प्रकोपामुळे संपुष्टात आल्या असून शासन संपुष्टात आलेल्या फळबाग शेतकऱ्यांचा विचार करणार का? असा प्रश्न सामान्य द्राक्ष फळबाग शेतकरी वर्गातून केला जात आहे.