*करकंब येथे मंगळवारी महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार महामंडळ नाव नोंदणी शिबिराचे आयोजन.* भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या वतीने *मा.आमदार प्रशांतमालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम.*

*करकंब /प्रतिनिधी
:-सोलापूर जिल्ह्याचे नेते व अभ्यासू माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक सामाजिक बांधिलकी समजून सामाजिक उपक्रम म्हणून करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे मंगळवार दिनांक-30/8/2022 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार महामंडळ च्या वतीने नाव नोंदणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस मनोज पवार यांनी सांगितले*.
*इमारत व बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचे उद्घाटन-युटोपीयन शुगरचे चेअरमन रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या शिबिरास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष-सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे सर, पांडुरंग परिवाराचे नेते-बाळासाहेब देशमुख, विरोधी पक्षनेते-राहुल काका पूरवत, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस-लक्ष्मण तात्या वंजारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा ओबीसी विभागाचे सरचिटणीस संतोष काका पिंपळे, भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे सलीम बागवान, तालुका सरचिटणीस राजेंद्र करपे सर, करकंब शहर अध्यक्ष महादेव(बंडु) कुलकर्णी मिलिंद उकरंडे, पै. औदुंबर कुंभार, रोहिदास चौगुले, विजय मामा माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी , तसेच इमारत व बांधकाम कामगार कुटुंबातील लोकांनी जास्तीत जास्त सहभागी नोंदणी करून घेण्याचे आवाहन जनता पार्टीचे कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस मनोज पवार यांनी केले आहे.*