*करकंब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाच्या आयोजन.*

करकंब/ प्रतिनिधी
:- महाराष्ट्र राज्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त करकंब येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विविध विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक दोन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक एक या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तसेच खाऊ वाटप करून विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
यावेळी आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे, तालुका सरचिटणीस भागवत लोंढे, तालुका कोषाध्यक्ष रजनीकांत शिंदे, करकंब शहराध्यक्ष राजू शिंदे, तालुका उपाध्यक्ष वंशादीप शिंदे, करकंब शहर कार्यवाहक मनोज शिंदे, करकंब संघटक सचिव आकाश शिंदे, तालुका युवक खाटीक समाज अध्यक्ष सोमा पलंगे, रोहन खंकाळ, राजरत्न सरवदे, सौरभ लोंढे, आकाश शिंदे आणि पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते, शिक्षक , शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.