*मुख्यमंत्री शिंदे यांच्या सौभाग्यवतीने वाढदिनी घेतला विठ्ठलाचा आशिर्वाद..!*

पंढरपूर/प्रतीनीधी
महाराष्ट्र राज्याचे धाडशी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ लताताई शिंदे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज, व पंढरपूरच्या विठ्ठला रुक्मिणी यांचे दर्शनासाठी आवर्जून दौरा झाला.
या वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सौभाग्यवती आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यातील विश्वासू शिलेदार असलेले शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे व त्यांच्या सौभाग्यवती आणि लक्ष्मी टाकळी सौ ग्रामपंचायतीच्या सदस्य रोहिणी महेश साठे, जिल्हाप्रमुख मनीषा काळजी, साईनाथ बडवे सुमित शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.