*करकंब येथील नियोजित राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बाबत जनतेमधून चर्चा*

*करकंब येथील नियोजित राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बाबत जनतेमधून चर्चा
करकंब /प्रतिनिधी:- नगर - विजापूर रोडवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर करकंब गावा नजीक होणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाच्या धास्तीने अलीकडच्या काळात या रस्त्यालगत थाटलेल्या लहान मोठया व्यवसायकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
करकंब चा विस्तार अलीकडच्या काळात लोकसंख्येबरोबर व्यवसायिक क्षेत्रात ही मोठया झपाट्याने होत आहे. विशेषतः जलोली चौक मध्ये व्यावसायिकांचे मोठया वेगाने स्थलांतर होत आहे.अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजनातील नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 216 हा सध्या असलेल्या राज्यमार्गावरून जाणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे मोठे डिपॉझिट,किंमती देऊन जागा मिळविल्या आता मात्र हा राष्ट्रीय महामार्ग(उड्डाणपूल) होणार असल्याची चर्चा नसून खात्री झाल्याने कुठून सुरू होणार व कुठे संपणार याकडे लगतच्या व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.प्राप्त वृत्तानुसार हा उड्डाणपूल खंडोबा मंदीर ते जुना शेवते(कनकंबा मंदीर च्या पुढे) रस्ता च्या आसपास होणार असल्याची चर्चा असल्याने भविष्यात इथून पुढच्या काळात शंकरनगर,होटेल महावीर परिसर या भागातील जागेच्या किंमती वाढणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे
.