*अरे ....कुठे नेऊन ठेवला एकनाथ..... महाराज पालखी मार्ग.....!*

करकंब/ प्रतिनिधी :
-दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी सोहळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असून या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी लाखो भाविक भक्त पंढरपूर कडे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात. महाराष्ट्रातच नव्हे अवघ्या जगभरात ही या अध्यात्मिक सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली असल्याने जगभरातील अनेक परदेशी या सोहळ्यासाठी पंढरीच्या वारीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि या पायी चालत आलेल्या वारकऱ्यांच्या भेटीसाठी आकर्षित होऊन येतात. करकंब पंढरपूर पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असल्याने करकंब मुक्कामी अनेक साधुसंतांच्या पालखी सोहळा दिंडी या मार्गावरून श्री पांडुरंगाच्या या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मार्गस्थ होत असतात. या प्रमुख पालखी सोहळ्यामध्ये श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री शनेश्वर महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत निळोबाराय महाराज, श्री संत कैकाडी महाराज बाबा, श्री संत गजानन महाराज शेगाव आदीसह विविध लहान मोठ्या पालखी सोहळा तसेच प्रमुख दिंड्या अनेक वर्षापासून या करकंब मध्ये मुक्कामी मुक्काम या अकरा संजीवन समाधी स्थळी करकंब सह या गावाशी संलग्न असणारे वाड्या वस्तीवरील तसेच 42 गावातील लोक या संतांच्या पालखीच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह येतात.
या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पायी वारी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी करकंब मार्गे येणारा श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्ग गेल्या अनेक वर्षापासून मंजूर करण्यात आला. या रस्त्याचे काम अद्याप सुरू असल्याचे सांगितले जाते. पण हा श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्ग कुठून सुरू होतो.... आणि कुठे काम सुरू आहे.... हे पांडुरंगाला ठाऊक...! हा श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्ग करकंब येथे मुक्कामी असताना करकंब येथे पालखी तळाची व्यवस्था... आहे का ..? श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्गावरून येथे तो रस्ता कोठे आहे.. पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार रस्ता कोणता.....?त्यातच या श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्या बरोबर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या असलेल्या रस्त्यावर ची दुरावस्था... हा श्री संत पालखी मार्ग... पालखी तळापासून गावातून जाणारा हा श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्ग नेमका कुठे गायब झाला....? हे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनाच माहीत असल्याची चर्चा सर्वसामान्य लोकातून होत असून अरे.... कुठे नेऊन ठेवला.... श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्ग.... याबाबत ची चर्चा ही भाविक मधून केले जात आहे.