पंढरपूर तालुक्यात आजून एका उद्योजकांची समाजकारणात उडी  गादेगावचे डी बिल्डर यांच्या समाजसेवेची पावती म्हणुन सत्कार  जन्मभूमितला योद्धा म्हणून जगताप कुटुंबीयांनी केला सन्मान   

पंढरपूर :- प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यात सध्या एक उद्योजक म्हणून धराशीव साखर कारखान्याचे चेअरमन आणी  डी व्ही पी ग्रुपचे मालक अभिजीत पाटील यांचे नाव समाजसेवेसाठी सर्व राज्यांमध्ये पसरले असतानाच आता मागिल काही दिवसापासून गादेगावचे भुमिपुत्र उद्योजक दत्तात्रय बागल उर्फ डी बिल्डर यानीही आपण समजाचे काहितरी देणे लागतो याच भूमिकेतून समाजकारण सुरु केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून त्यानी गावात एक कोविड सेंटर उभारून उपचारासाठी खुले ठेवले आहे.या कार्याची दखल घेउन गावतील जगताप परिवारच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.
    हा जन्मभूमीतला सत्कार आसल्यामुळे डी बिल्डर यानी तो सत्कार मनोभावाने स्वीकरत ग्रामस्थांचे आभार मानले.
यावेळी  स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे जिल्हा आध्यक्ष तानाजी बाबू बागल,  मनसे चे  अनिल बागल , एनपी कंट्रक्शन चे  डॉक्टर रमेश फाटे, शिवरत्न चे अध्यक्ष गणपत मोरे, गणेश बागल अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते संदीप कळसुले, विकास बागल साहेब, शांतीनाथ अर्जुन बागल, अजिनाथ बागल,बाबू रकटे, अण्णा टिंगरे (विठ्ठल ज्वेलर्स पंढरपूर),संदीप गायकवाड वाखरी, अतुल गायकवाड वाखरी,योगेश जगताप,जयवंतजगताप,यशवंत जगताप तसेच इतर मित्र मंडळ उपस्थित होते.