*दोन यशस्वी कहाणीकार आले एकत्र* *अभिजीत पाटील आणि रोंगेसर यांच्या पॅनलचे प्रस्थापिता विरोधात तगडे आव्हान* *विठ्ठलच्या निवडणुकीत स्वाभिमानी युतीचे सभासदाकडून जोरदार स्वागत*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचे निवडणुकीत चार पॅनल रिंगणात असतील असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु ऐनवेळी अभिजीत पाटील यांनी डॉ रोंगे सर यांच्या बरोबर जुळवून घेत आघाडीच्या वतीने 21उमेदवार निवडणुकीत उतरविले आहेत. यामुळे अगोदरच सर्व शेतकरी संघटना यांनी दाखविलेली एकी आणि त्यातच रोंगेसर यांच्याबरोबर झालेली युती ,यामुळे विरोधी असलेल्या प्रस्थापित नेतेमंडळी समोर तगडे आव्हान उभे केले आहे.
वरील दोन्हीही नेते आपापल्या क्षेत्रात चांगले काम करून यशस्वीपणे नावलौकिक मिळविला आहे. यामुळे या विठ्ठल करखान्याचेही मागे पडत चाललेले नाव पुन्हा नावारूपाला आणण्यासाठी आता वरील यशस्वी जोडी एकत्रितपणे मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरले असल्याचे दिसून आले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे सर्वच प्रस्थापित नेतेमंडळी एकत्रित असतानाही डॉ बी पी रोंगेसर यांनी 6हजार पेक्षा जास्त मतदान घेऊन आपले नाव प्रत्येक सभासद यांच्या तोंडी आणले होते. तर अभिजीत पाटील यांनीही आपण सभासद असलेला विठ्ठल कारखाना नावारूपाला आणून दाखविण्यासाठी ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी चालू केली होती. अनेक गावातील अनेक सभासद यांच्या घरी जाऊन भेटी गाठी पार पडल्या आहेत.
रोंगेसर आणि अभिजीत पाटील केवळ पैसे मिळविण्यासाठी नाही तर या कारखान्यातील अवस्था पाहून एकत्रितपणे लढा देत विजयाची खात्री निर्माण करून घेतली आहे.
मागील अनेक दिवसांपासून या निवडणुक प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु याबरोबरच या निवडणुकीत कोणत्या उमेदवारांना कोणत्या पॅनलमधून उमेदवारी मिळणार, याची जोरदार पणे चर्चा रंगत होती. परंतु सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने उमेदवारी बाबतची चर्चा थांबली आहे. आज अचानक रोंगेसर आणि अभिजित पाटील या दोन्ही यशस्वी नेत्यांनी एकत्रित येत ही निवडणूक लढविणार असल्याने सर्व चर्चा थांबून सभासदातून एकीचे स्वागत केले आहे. यामुळे आमचा विजय निश्चित असल्याची माहिती अभिजीत पाटील आणि रोंगेसर यांनी दिली आहे.