*उद्या शनिवारी पंढरीत आ यशवंत माने यांचा जनता दरबार* *पंढरपूर तालुक्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन

पंढरपूर/प्रतिनीधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना काही आपल्या समस्या मांडायच्या असतील , त्यांची सोडवणूक करण्यासाठी शनिवारी
दि 25 रोजी आमदार यशवंत(तात्या)माने यांचा जनता दरबार होणार आहे.
हा जनता दरबार पंढरपूर येथील शासकीय विश्राम गृह येथे होणार आहे. यासाठी दुपारी ३वाजता उपस्थित राहावे असे आवाहन स्वीय सहाय्यक संतोष ननवरे यांनी केले आहे.
मोहोळ मतदार संघ हा मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या तीन तालुक्यातील जनतेचा आहे. यामध्ये ज्या गावांचा समावेश आहे. त्या भागातील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तीनही तालुक्यात जनता दरबार घेतला जातो. तरी शनिवारी पंढरपूर भागातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.