*अखेर... करकंबच्या अतिक्रमणाबाबत विजय माळी यांची उपोषणास सुरुवात...!*
करकंब/ प्रतिनिधी
:-करकंब येथील गावठाण मधील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करण्यासंदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती त्यांच्याकडे यापूर्वी निवेदन देऊनही गावठाणातील अतिक्रमण काढून हा रस्ता करण्यात आला नसल्यामुळे करकंब येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मामा माळी यांनी लेखी निवेदन देऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांच्या कार्यालयासमोर आमरणउपोषण सुरू केले आहे.
आज सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणास सुरुवात झाली असून उपोषण सुरू झाल्यापासून उपोषण स्थळी गावकरी तसेच विविध स्तरातून भेट देण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.
या उपोषण स्थळी माजी सरपंच-दिलीप नाना पुरवत, माजी. जि प सदस्य-बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राहुल काका पूरवत, भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष-मनोज पवार, भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका सरचिटणीस -लक्ष्मण तात्या वंजारी ,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष-महादेव (बी.के.) कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, संजय घोडके-तालुकाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना), ज्येष्ठ नेते-काकासाहेब बुराडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना)सत्यवान ( पिंटू) गुळमे, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष -उमेश गोडसे , शहराध्यक्ष -महेंद्र लोंढे,मुस्तफा बागवान, सतीश माळी, विठ्ठल खपाले आदिसह विविध पक्षाचे , संघटनेचे ,पदाधिकारी आणि गावकरी यांनी भेट दिली.
आज सायंकाळी सात वाजता गटविकास अधिकारी-प्रशांत काळे, सरपंच प्रतिनिधी ग्रामविकास अधिकारी डॉक्टर सतीश चव्हाण तसेच विस्तार अधिकारी सह अधिकाऱ्यांनी या उपोषण स्थळी भेट देऊन सुमारे दीड तास थांबून सदरचे उपोषण थांबवण्यासाठी विनंती करून सदरचे काम चालू करू असे सांगितले. परंतु जोपर्यंत काम चालू होत नाही. अतिक्रमण निघत नाही. उपोषण चालूच राहील. भेटीस आलेल्या संबंधीत शिष्टमंडळास उपोषणकर्ते विजय मामा माळी यांनी सांगितले.घेतल्यामुळे अखेर शिष्टमंडळास माघारी फिरावे लागले.