*लोकसहभागातील रस्ता इतरांना आदर्श ठरेल : आ. प्रशांत परिचारक* *बोहाळीयेथे शेतकर्यांनी तयार केलेल्या मुरमीकरण रस्त्याचे उदघाटन*

करकंब/ प्रतिनिधी:
दैनंदिन गरजांपैकी रस्ते ही एक महत्वाची गरज निर्माण झालेली आहे. रस्ता जर शेतापर्यंत असेल तर पिकवलेला शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहचविता येतो.त्यामूळे रस्ते ही विकासामध्ये महत्वाची भुमिका बजावतात. बोहाळी येथील शेतकर्यांनी एकत्रित येत लोकसहभागातून तयार केलेला रस्ता हा तालूक्यातील इतर शेतकर्यांसाठी आदर्शवत उदाहरण असल्याचे गौरवोदगार आ. प्रशांत परिचारक यांनी काढले.
बोहाळी (ता.पंढरपूर) येथे बोहाळी-खर्डी रस्ता ते बोहाळी रेल्वे स्टेशन जुना रस्त्याला जोडणारा सुमारे 2 किमी मुरमीकरणाचा रस्ता शेतकरी रविंद्र कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, दिलीप गायकवाड, उमेश नलावडे, साहेबराव जाधव आदी शेतकर्याच्या जमिनीमधून तयार केला आहे. तर या भागातील 50 हून अधिक शेतकर्यांनी लोकसहभाग दिला आहे. या रस्त्याचे उदघाटन गुरुवार दि. 23 रोजी आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
आ. प्रशांत परिचारक पुढे बोलताना म्हणाले की, पंढरपूर शहराचा वाढता विस्तार पाहता हे शहर चौहोबाजुनी सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांनी जोडले गेले आहे. तर शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आलेले आहे. यामूळे शहरातील वाहतूक सुरळीत होत आहे. तर तालूक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते जिल्हा मार्गात रुपांतरीत केले आहेत. रस्ते मोठे होऊ लागल्यामूळे दळणवळण व्यवस्था वाढीस मदत होत असल्याचे सांगत आ. परिचारक यांनी ' विकासाचे व्हिजन, उपस्थित शेतकर्यांना सांगीतले. तर बोहाळी येथील शेतकर्यांनी तयार केलेल्या रस्त्याचे भविष्यात खडीकरण, डांबरीकरण करुन दिले जाईल, असे सांगीतले. याप्रसंगी शेतकर्यांनी जुना बोहाळी रेल्वे स्टेशन रस्त्याचे खडीकरण करुन देण्याच्या मागणीसाठी आ. प्रशांत परिचारक यांना निवेदन दिले.
यावेळी पांडूरंगचे माजी व्हा. चेअरमन आप्पासाहेब जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, सुनिल भोसले, दुर्योधन खूळे, नारायण जाधव, अनिल बाबर, नारायण खुळे, विकास सोसायटीचे चेअरमन संतोष जाधव, राजेंद्र जाधव, सुनील जाधव, सुधाकर पाटील, बंडू घाडगे, प्रा. विकास गायकवाड, मेजर विजय धुमाळ, सुधाकर कसगावडे, बाळासाहेब चव्हाण, जयराम मस्तुद, हुसेन पटवेकरी, विठ्ठल बाबर बाजीराव गायकवाड, आदीसह शेतकरी उपस्थित होते.