*सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे नेतृत्व-आमदार प्रशांत परिचारक*

*सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे नेतृत्व-आमदार प्रशांत परिचारक*

करकंब /प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश धनवे सर यांचे सहकारी मित्र श्रीकांत वेदपाठक यांनी श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पोट्रेट तयार करून आमदार प्रशांत परिचारक यांना भेट दिले. यावेळी सतीश धनवे सर श्रीकांत वेदपाठक मा नगरसेवक नागेश सिंगण सर तुकाराम आप्पा राऊत नवनाथ रानगट नारायण शिंगण श्याम सिंगंण सौरव कुलकर्णी मनोज कागे केतन बुद्याळ कैवल्य उत्पात केशव भोसले आदी उपस्थित होते.
 आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांचे पोट्रेट भेट दिल्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांनी हे पोट्रेट ऑफिस मध्ये ठेवून कामकाजाला सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा मोठा सन्मान करणारे विकासात्मक नेतृत्व सामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणारे काम प्रशांत मालकच करू शकतात हे त्यांच्या कृतीतून दिसून येत असल्याची भावना व कृतज्ञा यावेळी सतीश बाळासाहेब धनवे सर यांनी व्यक्त केली.