*करकंब येथील ओढ्यावरील पुलाच्या बांधकामासाठी मंत्रालय स्थरावर पाठपुरावा करणार – मदार मुर्शद*

करकंब. /प्रतिनिधी
– करकंब धाकटी वेस येथील ओढ्यावरील पुलाच्या बांधकामासाठी मंत्रालय स्थरावर पाठपुरावा करणार असल्याचे समाजसेवक मदार मुर्शद यांनी सांगितले आहे.
यावेळी मुर्शद म्हणाले की, करकंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्र. 02 ते हायवे जाणाऱ्या रस्तावर एक ओढा आहे. या ओढ्याला पावसाळ्यात भरपूर पाणी येते त्यामुळे गावात जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होतो. ओढ्यातील पाणी कमी झाल्यावर लोक आपली वाहने गावात जाण्यासाठी पाण्यातून जबरदस्तीने नेत असतात त्यामुळे वाहनाचे चाक निष्टुन अनेक जण या ओढ्यात पडले आहेत. तर चार चाकी वाहनांचे इंजन पाण्यात गेल्यामुळे अनेक वाहन यामुळे बंद पडलेली आहेत. तसेच मुलांची प्राथमिक शाळा असल्यामुळे मुले देखील या ओढ्यातून शाळेत जात असतात त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असते. त्याअनुषंगाने या ओढ्यात पूल होणे नितांत गरजेचे आहे. ही मागणी लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील हे पुल झालेले नाही. परंतु आम्ही आता पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत स्थानिक आमदार बबनदादा शिंदे, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी व त्यानंतर महाराष्ट्र शासन मंत्रालय येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे समाजसेवक मदार मुर्शद यांनी सांगितले आहे.
यावेळी सोलापूर सार्वजनिक बांधकामांतर्गत पंढरपूर विभागातील येथील कनिष्ठ अभियंता वैभव पंडित, अतुल जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून येत्या अर्थसंकल्पात या पुलाचे मंजूर व्हावे. म्हणून वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितले.