वीज मंडळाचे सेवानिवृत्त प्रामाणिक कर्मचारी राजाराम नाईकनवरे यांचे निधन

पंढरपूर: प्रतिनिधी
पंढरपूर येथील संतपेठेत राहून संतासारखं सुसंस्कारित जीवन जगता येत,हे दादांनी सिद्ध करुन दाखवलं.विद्यार्थी दशा संपल्या संपल्या विज खात्यात रोजंदारीवर कामाला लागले,त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना त्याच खात्यात वायरमनची नोकरी लागली.प्रामणिक वायरमन ते लाईनमन असा नोकरीचा प्रदीर्घ प्रवास करुन ते सेवानिवृत्त झाले.सेवेच्या कालावधीत आणि एकूण जीवनामध्ये त्यांच्या गोड स्वभावामुळे हजारो माणसं त्यांना जोडली गेली.ते बोलू लागल्यानंतर ऐकतच रहावे असे वाटे.कायम हसऱ्या चेहऱ्याने समोरच्याला मार्गदर्शन करायचे. नोकरीत असताना युनियनचे अध्यक्ष, पतसंस्थेचे चेअरमन अशी पदे त्यांच्याकडे चालून आली.
ते एक कुटूंबवत्सल पिता,पती,भाऊ,आजोबा,आदर्श मुलगा अशा भूमिकेत राहून त्यांनी जीवनात सौंदर्य निर्माण केले होते.सर्व पाहुणे-नातेवाईक यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे व स्नेहाचे नाते होते.थोड्या पगारात प्रपंच नेटका करुन समाधानी राहता येते ,हा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांनी गोपाळपूरला शेतजमीनही घेतली आहे.सेवानिवृत्तीनंतर ते खूप आनंदी जीवन जगत होते.
ते मातृभक्त होते,ते आईची अखंड सेवा करत. सुनांना लेकीप्रमाणे व जावयांना मुलाप्रमाणे माया लावणारे पितृतुल्य सासरे म्हणून ख्यातकिर्त आहेत. विक्रम(थोरला मुलगा) यांना देशसेवेचे धडे देवून सैन्यात दाखल करुन भारतमातेच्या सेवेत त्यांना रुजू केले.
त्यांच्याबद्दल लिहीण्यासारखं व आपल्याला आदर्श घेण्यासारखं खूप आहे. त्यांचे अचानक जाणे हा माझ्यासाठी खूपच मोठा दु:खाचा धक्का आहे.माझे दु:ख मी शब्दात सांगू शकत नाही.मी आज एक माझा उत्तम मार्गदर्शक हरवून बसलो.
त्यांच्या जाण्याने नाईकनवरे कुटूंबाचा आधार गेला, त्याचबरोबर समाजाची देखील अपरिमीत हानी झाली आहे.
निसर्ग शक्तीपुढे आपण हतबल झालो आहोत.
नाईकनवरे कुटूंबाला दु:खातून सावरण्याचं बळ मिळो,ही प्रार्थना