*माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या बदनामी बाबत अजून एका आरोपीस करकंब पोलिसांनी घेतले ताब्यात *करकंब पोलिसांची कामगिरी*

*माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या बदनामी बाबत अजून एका आरोपीस करकंब पोलिसांनी घेतले ताब्यात  *करकंब पोलिसांची कामगिरी*

करकंब /प्रतिनिधी:-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची करकंब मधील एका व्हाट्सएप ग्रुपवर बदनामी करणारी पोस्ट टाकल्याने करकंब व परिसरातील शिवसैनिकानी करकंब पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता.  रणजित कदम युवासेना पंढरपूर ता.प्रमुख यांनी दि.२४/६/२२ रोजी करकंब येथील महाराज रामणारायणदास बैरागी यांचे विरुद्ध करकंब पोलिसांत तक्रार दिली. घटनेचे गांभिर्य ओळखत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक मिलिंद पाटील यांनी रामणारायणदास बैरागी यांस अटक केली. व या प्रकरणी संशयित आरोपी बैरागी यांना एकूण ६ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली, या प्रकरणात अधिक तपास करता ही पोस्ट कुठून आली,कुठे फॉरवर्ड केली असा अधिक तपास केला असता यामध्ये नाशिक येथील एकाचा समावेश असल्याचे लक्षात येताच
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बदनामी प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी सुरेश परदेशी राहणार पंचवटी नाशिक येथून आरोपीस पोलीस हवालदार आर.आर. जाधव व बापू मोरे यांनी नाशिक येथे जाऊन त्यास आज ताब्यात घेऊन निर्माण केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
     सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व सहा. पोलीस निरीक्षक निलेश तारू करकंब पोलीस ठाणे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर आर जाधव पोलीस हवालदार बापू मोरे यांनी केले आहे.