*राज्यातील सत्ता बदलाने विठ्ठलच्या निवडणुकीत बदलणार रंग?* *पाटील विरुद्ध पाटील गटात वाढली चुरस*

*राज्यातील सत्ता बदलाने विठ्ठलच्या निवडणुकीत बदलणार रंग?*  *पाटील विरुद्ध पाटील गटात वाढली चुरस*

पंढरपूर,/ प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सह साखर कारखाना आर्थिक वाताहातीमध्ये असतानाही या संस्थेच्या निवडणुकीत तिरंगी लढत सुरू आहे. अशातच राज्यातील सत्ता बदलाचे वारे जोरदारपणे सुरू असल्याने याचा परिणाम मात्र विट्ठलच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.
    सध्या या निवडणुकीत भालके गटाकडून विद्यमान चेअरमन भगीरथ भालके यांनी हा कारखाना बंद पाडण्यासाठी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कारण सांगितले होते. काही दिवसांनी परत संचालक मंडळातील युवराज पाटील यांनी अडथळा आणला असे सांगत आहेत ,यामुळे आता हा बंद पडलेला कारखाना कोणाच्या भरवशावर यापुढील काळात चालू करतील याबाबत समजू शकले नाही. भालके हे राज्यातील सत्तेत असलेल्या 
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे नेते होते. मात्र सत्ता असतानाही त्यांनी कारखाना बंद पडला. सध्या राज्यात होत असलेल्या या सत्ता बदलाच्या वाऱ्यामध्ये  कोण कारखाना चालू करू शकतो. हा विचार मात्र भिरडून गेलेले सभासद नक्की करणार आहेत.
   विठ्ठलच्या निवडणुकीत  सध्या राष्ट्रवादीच्या दोन गटात विभागणी झालेली आहे. ही विठ्ठलची निवडणूक तिरंगी लढत होऊन लढविली जात आहे. यामध्ये विद्यमान चेअरमन भगीरथ भालके यांनी पुन्हा या निवडणुकीतही जुन्या संचालकांना उमेदवारी दिली आहे. याचीही मोठी नाराजी सभासदातून होत आहे. दुसरे पॅनल राष्ट्रवादीचेच असलेले  विद्यमान संचालक युवराज पाटील यांनी यांनी रिंगणात स्वतंत्रपणे उभे केले आहे. यामध्ये युवराज पाटील यांनी परिचारक यांना मानणारे परंतु जुने विठ्ठल परिवारातील काही उमेदवार उभे केले आहेत.
 या विठ्ठलच्या निवडणूक मध्ये केवळ आणि केवळ बंद असलेला हा विठ्ठल कारखाना सुरू झाला पाहिजे ,त्यामुळे उसाचा प्रश्न आणि कामगारांचाही  प्रश्न मिटविण्यासाठी अभिजीत पाटील यांनी मागील अनेक महिन्यापासून तयारी ठेवली होती. त्याप्रमाणे अभिजीत पाटील यांनी भाजपचे नेते आणि शिक्षण सम्राट डॉ रोंगेसर यांना सोबत घेऊन स्वतंत्र्य पॅनल रिंगणात उतरविले आहे. अभिजीत पाटील  हे बंद पडलेले कारखाने  तात्काळ चालू करून त्या त्या भागातील  शेतकरी आणि कामगारांची जुनी देणी दिल्याची  पावती आहे. त्यामुळे अभिजीत पाटील यांच्याबद्दलची विस्वसाहर्ता वाढलेली आहे.
  सध्या राज्यात नवीन सरकार आणि त्यामधील असलेले संबध पाहता अभिजीत पाटील आणि रोंगेसर यांच्याकडे सभासद आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे. 
    चेअरमन भगीरथ भालके यांच्या सोबत चेअरमन कल्याणराव काळे यांची आघाडी आहे.काळे यांनी भाजपची सत्ता असताना काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आल्यावर परत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या बदललेल्या राज्यातील सत्तेमध्ये भविष्यात हा कारखाना सुरू करण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेता. सभासद कोणता निर्णय घेणार हे पाहण्यासाठी आता कोणत्याही भविष्यकाराची गरज उरली नसल्याचे दिसून येणार आहे.