*आमदार बबनदादा शिंदे हे गोरगरीब व गरजू लोकांसाठी महान कार्य करताहेत - डॉ.तात्याराव लहाने*

करकंब /प्रतिनिधी :--
माढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न व समस्या मार्गी लागण्याबरोबरच आमदार बबनदादा शिंदे हे नेत्र शस्त्रक्रिया शिबिर,काशी व बुद्धगया यात्रा,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा,रक्तदान शिबिर आदी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू आणि जेष्ठ लोकांसाठी महान कार्य करीत आहेत.माढा मतदारसंघाला बबनदादासारखे कर्तृत्ववान आमदार लाभले हे जनतेचे नशीब असल्याचे प्रतिपादन नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.
ते माढा येथे माढेश्वरी अर्बन बँक, विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या वेळी बोलत होते.
प्रास्ताविक माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी केले.
याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे म्हणाले की,डॉ.तात्याराव लहाने व डॉ.रागिणी पारेख यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम कोरोनाच्या काळाचा अपवाद वगळता सातत्याने राबवित आहोत.या दोघांनी आपले आयुष्य गोरगरीब व गरजू लोकांसाठी वाहून घेतले आहे.पुढील नेत्र शिबिरापर्यंत माढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑपरेशन थिएटर अद्ययावत व्हावे याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून दीड कोटी निधी दिला असून त्याठिकाणी ऑक्सीजन व जनरेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डी.व्ही.चवरे यांनी केले. आभार डॉ.गोरख देशमुख यांनी मानले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर,नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रागिणी पारेख,कृषीभूषण सुनंदाताई शिंदे,माजी आमदार धनाजीराव साठे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे,संचालक अमोल चव्हाण,पोपट गायकवाड,बार्शीचे डॉ. बी वाय यादव,अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले,जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव, डॉ.गणेश इंदुरकर,डॉ.निशिगंधा माळी, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील,तहसीलदार राजेश चव्हाण, सपोनि शाम बुवा, डॉ.शिवाजी थोरात,डॉ.अशोक मेहता,माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद,राजेंद्र पाटील,वंदना माने,नानासाहेब शेंडे, संतोष अनभुले,उदय माने,झुंजार भांगे,नगरसेवक चंद्रशेखर गोटे, शाखा उपनिबंधक मोहन कदम, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, सचीन चवरे यांच्यासह माढेश्वरी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.