*करकंबला... संचालक पदासाठी यंदा तरी.. विठ्ठल..... पावणार का.......?*

*करकंबला... संचालक पदासाठी यंदा तरी.. विठ्ठल..... पावणार का.......?*

करकंब /प्रतिनिधी

:-करकंब हे पंढरपूर तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून पूर्वीपासून परिचित आहे. पूर्वी या राजधानीचा राजकीय दबदबा पंढरपूर तालुक्यात प्रचंड होता. त्या काही वर्षांमध्ये या धबधब्या मधून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे करकंब करांना संचालक... पदाने हुलकावणी दिली आहे. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये करकंब हे अग्रेसर गाव असल्याने संचालक.... पद न मिळणे म्हणजे मोठे दुर्दैव आहे. कुणाच्या प्रतापामुळे आज पर्यंत करकंब ला संचालक पद मिळाले नाही. याचीही चर्चा ऊस उत्पादक शेतकरी सभासद व या करकंब गटातून केली जात आहे. गावगाड्यातील असलेल्या गाव गुंड्या न  समज समजणारे तालुक्यातील नेते मात्र  हुशारीने व चाणाक्षपणे करकंब च्या बाबतीत.... संचालक पद ....देण्याबाबत  ऐनवेळी... फुली....मारतात. एकेकाळी तालुक्याच्या राजकारणात सहकार क्षेत्रात त्याच बरोबर राजकारणात प्रचंड दबदबा असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या संचालक पदाला मोठी प्रतिष्ठा... एक वेगळ्या प्रकारे दरारा ... एक वेगळा सन्मान होता. आज मात्र गेले ते दिवस ..राहिल्या.... त्या आठवणी... म्हणून या करकंब गटातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक संचालक पदासाठी यंदा तरी...विठ्ठल ... पावणार का....? या प्रतीक्षेत असून याची उत्सुकता करकंब करांना लागून राहिली आहे.