*अखेरच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी लढत राहणार-प्रभाकर भैया देशमुख* *करकंब येथे जनहित शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार*

*अखेरच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी लढत राहणार-प्रभाकर भैया देशमुख* *करकंब येथे जनहित शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार*

 
 करकंब /प्रतिनिधी

:-सोलापूर सह राज्यातील सर्वसामान्य व शेतकरी आणि तळागाळातील लोकांसाठी हिताच्या दृष्टीने त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करून अखेरच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी लढत राहणार असल्याचे मत जनहित शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख  व्यक्त केले.
ते करकंब येथे आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जनहित शेतकरी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकट रमण उर्फ पिनु देशमुख पंढरपूर तालुका अध्यक्ष महेश बिस्किटे विष्णु देशमुख सुधीर देशमुख आबा बोडके महेंद्र माळी नितीन सरडे अशोक देशमुख योगेश पिसे नारायण शिंदे माळी राजू खारे महेश देशमुख अरुण बनकर सतीश खारे हेमंत तारळकर अदिसह बहुसंख्य पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते शेतकरी महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
वीज महावितरण शेतकऱ्यांकडून सुलतानी वसुली सुरू केल्याच्या निषेधार्थ जनहित पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी आंदोलन करून याबाबत शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र महावितरणने याबाबत खोटा गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने प्रखर आंदोलन केल्याने करकंब येथील जनहित पक्षाच्यावतीने प्रभाकर भैया देशमुख व महेश बिस्किटे यांचा भव्य नागरी सत्कार करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश खाडे गुरुजी सर प्रस्ताविक अशोक देशमुख यांनी केले.