पंढरीत धनगर समाजातील नूतन पदाधिकारी यांचे सन्मान* *डॉ देवकते परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत केले होते आयोजन

पंढरीत धनगर समाजातील नूतन पदाधिकारी यांचे सन्मान*  *डॉ देवकते परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत केले होते आयोजन

पंढरपूर/प्रातिनीधी

पंढरीतील नामांकित असलेल्या लहान मुलांचे देवकते हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर श्रीकांत देवकते व डॉक्टर सुजय देवकते यांच्यावतीने धनगर समाजातील विविध पदावर  विराजमान झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देवकते परिवाराच्या वतीने भव्य दिव्य असा नागरी सत्कार करण्यात आला.

कोणताही राजकीय हेतू न ठेवता ,केवळ आपल्या धनगर समाजातील अनेक मान्यवर हे मोठ्या प्रमाणावर धनगर समाजासाठी काम करत असताना त्यांच्या पाठीवरती कोणीतरी शब्बासकीचा हात टाकावा. या भावनेतून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सांगोला तालुक्याचे युवा नेते  डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते व पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व धनगर समाजाचे जेष्ठ नेते ऍड  वामनराव मानेसर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आला. यावेळी माढा तालुक्याचे लोकनेते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण  सभापती सन्माननीय शिवाजीराजे कांबळे, तसेच जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर प्रा. सुभाषराव माने सर, उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू बापू गावडे, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजीराव वाघमोडे, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत नाना कोळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडित अण्णा शेंबडे, महादेव लवटे, प्रा. सुभाष मस्के सर, नितीन काळे, अजय सिंह उर्फ नाना खांडेकर, प्रशांत घोडके, सोमा ढोणे, माऊली हळानवर व सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.