*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोमवारी भोसे पाटी येथे रस्ता रोको आंदोलन*. *वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी बनले आता आक्रमक* *आंदोलनाला सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन*.

करकंब/ प्रतिनिधी:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मागील एक महिन्यापासून शेती पंपाच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना, अतिवृष्टी महापूर व मागील वर्षाचे उसाचे बिल न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यावर्षी मार्च महिन्यामध्ये महावितरण च्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी वीज भरते आहे परंतु आता तीन महिन्यात परत एकदा महावितरण तीन पंपाच्या वसुलीसाठी शेतकर्यांना वेठीस धरले आहे.
: सध्या ग्रामीण भागात ऊस तोड सुरू आहे. अजून मागील वर्षाचे शेतकऱ्यांची बिले निघाली नाहीत. शेतकरी थोडेफार बिले भरतील परंतु महावितरणने बेकायदेशीरपणे पूर्ण वीजपुरवठा खंडित केला आहे .त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे .जर महावितरण पिण्यासाठी सुद्धा विज सोडणार नसेल तर शेतकरी महावितरण वर न्यायालयातून कायदेशीर कारवाई करेल. त्यामुळे महावितरणच्या या पठाणी वसुली वर लगाम घालावा. चुकीची पद्धतीने वीजबिले ,वाढीव वीज बील आकारणी, शेतकऱ्यांचे डी पी भरून न देणे ,शेतकऱ्यांना केबल दुरुस्तीचे साहित्य न देणे या दोन गोष्टींमध्ये महावितरणने पारदर्शकता आणावी . व मगच बेल मागावे .शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी सोमवार दिनांक -२२/१२/२०२१रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत भोसे पाटी (क)येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्याच्या वतीने माननीय कार्यकारी अभियंता वीज वितरण महामंडळ पंढरपूर यांना देण्यात आले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी विष्णू बागल, बळीराजा शेतकरी घटनेचे प्रदेशाध्यक्ष-नितीन बागल,जिल्हा संघटक शहाजान शेख, राज्य प्रवक्ता रणजित बागल, नानासाहेब चव्हाण, रामदास खराडे आदी पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.