*उजनीतील धरणातील गाळ काढून जिल्हयाच्या *कानाकोपर्‍यात उजनीचे पाणी पोहाचविणार*:*आ.राम सातपुते* *पंढरपूरातील  मेळव्यात माढा व सोलापुरातून मताधिक्य देण्याची शिवसेनेची हमी*

*उजनीतील धरणातील गाळ काढून जिल्हयाच्या *कानाकोपर्‍यात उजनीचे पाणी पोहाचविणार*:*आ.राम सातपुते*  *पंढरपूरातील  मेळव्यात माढा व सोलापुरातून मताधिक्य देण्याची शिवसेनेची हमी*

पंढरपुर /प्रतिनीधी 

  खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर केंद्र आणि राज्यशासनाच्या मदतीने उजनी धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेवुन ,जिल्हयाच्या कानाकोपर्‍या पर्यंत उजनीचे मुबलक पाणी पोहोचविणे तसेच स्थानिक तरुणांना सोलापूरातच काम निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे. तरी सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघातून आम्हा भाजपाच्या े दोन्ही उमेदवाराना मोठया मताधिक्याने विजयी करावे. असे अवाहन आ.राम सातपुते यांनी पंढरपूरात झालेल्या  शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात केले.शिवसेनेचे संंपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने माढा व सोलापूर मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता.अध्यक्षस्थानी आ.शहाजीबापू पाटील होते.या प्रसंगी माढा लोकसभेचे उमदेवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळनर,प्रा.शिवाजीराव सावंत,भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महावीर देशमुख,सोलापूरचे माजी नगरसेवक अमोलबापु शिंदे,प्रा.बी.पी.रोंगे,शिवसेनेचे जिल्हयातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित शिवसैनिकांनी माढयातून खा.रणजितसिंह निंबाळकर व सोलापूरातून आ.राम सातपुते यांनी प्रचंड मताधिक्य मिळवुन देण्याचे अश्वासन या प्रसंगी दिले

आ.राम सातपुते पुढे बोलताना म्हणाले मी उसतोड कामगाराचा मुलगा असून दुष्काळ काय असतो ते मी अनुभवले आहे.सोलापूर जिल्हयाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी मी स्वता खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.शहाजीबापु पाटील यांनी अथक प्रयत्न केले आहेत.दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळाले म्हणून खा.निंबाळकर यांची सांगोल्यात हत्तीवरुन मिरवणूक काढली होती.कधी काळी सोलापूर जिल्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होती मात्र मात्र मोदी सरकारने या जिल्हयात 40 हजार कोटींचे रस्ते केले.सोलापूर,पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते चकचकीत झाले असून आमच्या मायमाउलींच्या डोक्यावर असलेला पाण्याचा हंडा उतरविण्यासाठी एक हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायती मध्ये जलजिवन मिशन व्दारे पिण्याचे शुध्द पाणी मिळालेले आहे.घरातील चुल काढण्यासाठी मोदींजींनी सोलापूर जिल्हयातील दोन लाख घरात उज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडण्या दिल्या आहेत.ही निवडणुक सोलापूर जिल्हयचे व  देशाचे भवितव्य ठरविणारी असल्याने मोदींजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपास मते दया असे अवाहन आ.सातपुते यांनी या प्रसंगी केले.
प्रा.शिवाजीराव सावंत बोलताना म्हणाले शिवसेना व भाजपाच्या कार्यकत्यांनी एकत्रित पणे हातात हात घालून काम करणे गरजेचे असून भाजपाचे दोन्ही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार या बाबत मला कोणतिही शंका नाही परंतु निवडून आल्यावर त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांप्रमाणे शिवसैनिकांना जवळ घेवून त्यांचीही कामे करावीत अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

चौकट  
शरद पवारां मुळे पंढरपूर बारामती रेल्वे मार्ग रखडला : खा.रणजितसिहं निंबाळकर

माढा मतदारसंघातून निवडून गेलेल्या शरद पवारांनी या भागातील जनतेला फसविण्याचे काम केले,उजनीचे पाणी बारामतील पळविले मी व आ.शाहाजीबापु पाटील यांनी ते पाणी पुन्हा जिल्हयाला मिळवून दिले.बारामती पंढरपूर रेल्वे मार्गासही पवारांनी विरोध केला.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास विरोध केला त्यांमुळे या मार्गाचे काम रखडले.