*अवकाळी पावसाने झोडपले...* * शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा.........*!

करकंब /प्रतिनिधी.
सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांचे माहेरघर असणारे करकंब, कासेगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षे उत्पादन व बेदाणा निर्मिती होत असते.
सलग तीन दिवस पावसाची रिपरिप सुरू असताना काल मात्र पावसाने हा:हाकार केला .दोन तास मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले .त्याचबरोबर फळबागा व इतर नगदी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे ,शेतामध्ये पाणी साठल्यामुळे अनेक पिकांना याचा फटका बसला आहे . ऊस तोड थांबली गेली आहे.शेतकरी राजासोबतच या पावसाने विट ऊद्योजकांचेही मोठे नुकसान केले आहे.कष्टाने तयार केलेला विटमाल डोळ्यांदेखत विरघळताना पाहुन सर्वांची झोप उडुन गेली आहे.भविष्याची आशाच संपली आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे .मोठ्या प्रमाणात खर्च औषधांच्या फवारण्या करून शेतकरी हतबल झाला आहे.
काल रात्री आठ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढ्यानाल्यांना पाणी आला आहे.
खरीप पिकांमध्ये तूर ,ज्वारी, कांदा ,कडधान्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चौकट
वीट उद्योगासाठी शासनाला महसूल भरून माती उपलब्ध केली व वीट उद्योग सुरू केलेल्या अनेक वीटवाल्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.त्यांचे पंचनामे करून मदत मिळावी अशी त्यांची मागणी होत आहे.
कच्च्या विटा ,माती,बगँस, राख,कोळसा,गंधकचे पावसाने नुकसान झाले आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे ,करकंब
चौकट ---
सध्या द्राक्षावर पावसाने,दमट हवामानामुळे डाऊनी आणि कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे नुकसान झालेले आहे. यासाठी शासना कडून ठोस मदतीची अपेक्षा आहे.
सतीश देशमुख.
चौकट--**
मौजे जाधववाडी
द्राक्षबागायतदारच पार कंबरटे मोडून काढले आहे..काहीच्या बागेला तर फक्त दांडे राहीले आहे...
द्राक्षेबागेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गावातील 70%बागाचे नुकासन झाले आहे. दावण्या/कुजवा /गळ
काहीच्या लोंकाच्या बागा पोग्यात आहेत. त्याचे घड तर विरघळुन गेले आहेत.
द्राक्षेप्रमाणेच ऊस तोड कामगारांचा संसार पण पाऊसामुळे उगड्यावर आला आहे..
सिताराम
धुमाळ.
करकंब येथील
पांडुरंग कराळे यांच्या शेतात पाणी आले आहे. ओढानाला खोलीकरण व कमी उंचीच्या रस्त्यामुळे शेतात पाणी शिरले त्यामुळे प्रशासनाने पाणी जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बुधवार पेठ येथे जाणारा रस्ता सर्वांसाठी खुला करावा व पाईप टाकून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता करून द्यावे अशी मागणी त्या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.