पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट  ,आदर्श समाजसेवक बरोबरच झालेत आता ,आदर्श शेतकरीही!* समाजात सन्मान असलेल्या  शिरसट यांच डाळिंब विक्रीसाठी  पोहचल केरळमध्ये,*  *डाळिंबाला दरही मिळाला चांगलाच,*

पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट  ,आदर्श समाजसेवक बरोबरच झालेत आता ,आदर्श शेतकरीही!*  समाजात सन्मान असलेल्या  शिरसट यांच डाळिंब विक्रीसाठी  पोहचल केरळमध्ये,*   *डाळिंबाला दरही मिळाला चांगलाच,*

पंढरपूर: प्रतिनिधी


  लॉकडाउनच्या काळामध्ये अनेकांनी आपले लक्ष शेतीकडे दिले आहे आणि यातून भरघोस उत्पन्न देखील मिळवले आहे. असाच अनभुव  पंढरपूरकराना  आला  पंढरपूरची माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी आपल्या शेतामध्ये डाळिंबीची लागवड केली होती .वीस एकर शेतापैकी त्यांनी  चार एकर  भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली ,याकरिता उत्तम नियोजन आणि खत व्यवस्थापन करत त्यांनी त्यामधून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. माजी नगराध्यक्ष यांनी याकरिता सेंद्रिय खताचा वापर केला असून, त्याकरिता लागवडीपासून ते उत्पन्न येईपर्यंत डाळिंबाच्या बागेला आज रोजी पर्यंत तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे .आणि त्यांना यातून पंधरा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. शिरसाट यांच्या बागेतील डाळिंब हे केरळ या ठिकाणी विक्रीसाठी गेली असून त्यांना त्या ठिकाणी 70 रुपये किलो असा उत्कृष्ट दर मिळाला आहे .


आज रोजी त्यांचा दहा ते बारा गेला असून अद्याप पर्यंत त्यांना यातून खर्च वजा 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे .आणि याही पुढे जाणार असून त्यातूनही चांगले उत्पन्न मिळण्याची यांना अपेक्षा आहे .दरम्यान या करिता त्यांनी कठोर परिश्रम ही देखील घेतली आहे.
 दररोज आणि बारकाईने लक्ष देणे हे देखील त्यांनी सातत्याने केले आहे. दरम्यान ही बाब फुलवण्यासाठी चिरंजीव  विक्रम  शिरसाट व बबलू झिंजुरटे यांनी देखील परिश्रम घेतले आहे आणि त्यांच्या परिश्रमाचे फळ त्यांना मिळत आहे. तालुक्यात या बागेची चर्चा रंगली असून त्यांनी घेतलेल्या कष्टाचे आणि घेतलेला उत्पन्नाचे सध्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 
    शिरसट कुटुंबीय मागील अनेक वर्षे पंढरपूर मध्ये आपल्या समाजसेवक पदी आदर्श आहेतच पण आता ते आदर्श शेतकरी झालेत त्यामुळे त्यांची ही पद्धत इतरही समाजसेवक यांनी अवलंबली पाहिजे, अशी चर्चा होत आहे.