*विधानसभेच्या पायरीवरचे पडसाद .... ग्रामीण भागातील ग्रामपंचायतच्या सभेत....!* *करकंब ग्रामपंचायत च्या मासिक सभेत चक्क ग्रामपंचायत सदस्य बसले खाली.*
करकंब/ प्रतिनिधी
:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनाच्या अनुषंगाने विधान परिषद व विधानसभेचे सदस्यांनी विधानभवनाच्या पायरीवर जो धुमाकूळ घातला या धुमाकूळाचा पडसाद हळूहळू आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायत च्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये विकास कामावरून वाढत चालले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात मोठी 17 सदस्य संख्या असलेल्या करकंब ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी पार्टीचे नऊ तर विरोधक पार्टीचे आठ असे संख्याबळ असून या करकंब ग्रामपंचायत ची मासिक सभा आज दिनांक 26 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या मासिक सभेत सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सत्ताधारी सदस्य व विरोधक सदस्य यांची उपस्थिती होती. या मासिक सभेत सत्ताधारी पार्टीचे चार सदस्य तर विरोधी गटाचे विरोधी पक्ष नेते राहुल पूरवत यांचे सहा सदस्य खुर्चीवर बसलेले असताना विरोधी गटाचे बापूराव अर्जुन शिंदे या सदस्यांनी खाली बसून ठिय्या मांडून सत्ताधारी पार्टी जाणीवपूर्वक वार्ड नंबर एक मधील न्हावी गल्लीमधील गटार दुरुस्ती बाबत आणि घाणीच्या साम्राज्यबाबत व वार्ड एक मधील असलेल्या अनेक मूलभूत सुविधा बाबत दुर्लक्ष करीत असल्याने याचा तातडीने आजच्या आज निर्णय व्हावा अशी मागणी केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी चार दिवसात याबाबत माहिती देऊ असे सांगितले. गेल्या वर्षभरापासून मागणी करत असल्याने याने या खाली बसलेल्या सदस्याचे समाधान न झाले नाही. त्यामुळे अनेक जण खुर्चीसाठी काय पण...! म्हणून वादविवाद ,, टोकाची भूमिका घेतात. हे चित्र आपणास सगळीकडे पहावयास मिळते. मात्र या ग्रामपंचायत च्या मासिक सभेत मात्र वार्ड नंबर एक मधील विविध मूलभूत सुविधा अंतर्गत रस्ते स्वच्छता व घाणीच्या साम्राज्याबाबत ग्रामपंचायत सदस्याने ....खुर्चीवर ...बसण्याचा मोह टाळून खालीच बसणे पसंत केले..परंतू बिचाऱ्या ...ग्रामपंचायत सदस्यावर ...
जनतेसाठी खाली बसण्याची वेळ आणल्याने त्यातच सत्ताधाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने पहिले पाढे पंचावन्न म्हणून या विषयाला बगल दिली असल्याचे बोलले जात आहे.

या मासिक सभेत सन मार्च 2021 ते जुलै 2022 मधील झालेल्या मासिक सभा व ग्रामसभा याचा इतिवृत्त मिळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य बापूराव अर्जुन शिंदे व सौ रेखा नागनाथ गायकवाड यांनी ग्राम विकास अधिकारी डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे मागणी केली होती. गेल्या दीड वर्षापासून वेळोवेळी लेखी, तोंडी मागणी करूनही मासिक सभा व ग्रामसभा याचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) देण्यास टाळाटाळ करीत असून सभेमध्ये योग्यरीत्या प्रश्न विचारता येत नाही,, ग्रामपंचायत चा कारभार पारदर्शक चालवता येत नाही,, मागासवर्गीय( S. C.) प्रवर्गामधून सदस्य असल्याने न्याय हक्कापासून व कर्तव्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवून लोकशाहीचा गळा घोठण्याचे पाप व काम करीत असल्याचा गंभीरआरोप या लेखी निवेदनात केला असून येत्या आठ दिवसात या सर्व मागण्याची पूर्तता नाही झाल्यास यापुढे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी ग्रामपंचायत राहील असा इशारा या सदस्यांनी सर्व सहकार्यासह दिला आहे.