*रायगड येथील शिवराज्य अभिषेक सोहळ्यात करकंबच्या शिवरत्न मर्दानी खेळाच्या आखाड्याने सर्वांचे वेधून घेतले लक्ष......!* *छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले कौतुक..* *करकंब च्या शिवरत्न मर्दानी आखाडा खेळ बनला मुख्य आकर्षण.

*रायगड येथील शिवराज्य अभिषेक सोहळ्यात करकंबच्या शिवरत्न मर्दानी खेळाच्या आखाड्याने सर्वांचे वेधून घेतले लक्ष......!*  *छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले कौतुक..*  *करकंब च्या शिवरत्न मर्दानी आखाडा खेळ बनला मुख्य आकर्षण.

करकंब /प्रतिनिधी:-

नुकताच रायगड येथे दिनांक 6 जून रोजी शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून आलेल्या शिवभक्त शिवप्रेमी च्या उपस्थितीत संपन्न झाला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून करकंब येथील शिवरत्न मर्दानी आखाडा खेळाच्या मैदानातील युवकांनी रायगड येथे जाऊन आपल्या कलापथकाद्वारे एक आगळावेगळा आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा मर्दानी खेळ दाखवून करकंब च्या गावचा डंका छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावर वेगळा आकर्षण निर्माण केल्यामुळे या करकंब च्या शिवरत्न मर्दानी आखाडा खेळाच्या कला पथकाचे संपूर्ण रायगडावर कौतुक केले जात होते.
दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर शिवरत्न शिवकालीन मर्दानी आखाड्याने होळीच्या माळरानावर मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्तांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले. शिवरत्न मर्दानी आखाड्याचे संस्थापक प्रशिक्षक स्नेहदीप यशवंत व्यवहारे, त्यांच्या सहकारी रणरागिनी तसेच बाल गोपाळ मावळे यांची छत्रपती संभाजी महाराज यांनी आपुलकीने चौकशी करून कौतुक केले.
या सर्वांचा विशेष सन्मान रायगडावरती राज देवेश्वर येथे युवराज्ञी संयोगिताराजे संभाजी भोसले यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या शिवराज्य अभिषेक सोहळा जाण्याची संधी मिळाली हे आमच्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना संस्थापक स्नेहदीप व्यवहारे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कोमल देशमाने, नुपूर दुधाने, धनश्री घाणे, स्नेहल लोहार, समृद्धी देशमाने, जयदीप टाकले, स्नेहराज व्यवहारे, ओम टकले, आदित्य देशमुख, अथर्व शिंदे, वेदांत तेली यांच्यासह सहकारी मावळे उपस्थित होते.