*राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 264 प्रकरणे निकाली* *6 कोटी 95 लाख 15 हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल*

पंढरपूर /प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समितीच्यावतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 264 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण 6 कोटी 95 लाख 15 हजार 566 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. सलगर यांनी दिली.
या लोकअदालतीसाठी एकुण 5 पॅनलची व 1 नियमित न्यायालयाचे व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश ए.एस. सलगर, न्यायाधीश श्रीमती एस. एस. पाखले, न्यायाधीश ए. एस सोनवलकर, न्यायाधीश श्रीमती पी.एस.धुमाळ, न्यायाधीश के.ए.काटकर, न्यायाधीश श्रीमती पी.बी.घोरपडे यांनी काम पाहिले.
सदरची लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश ए.एस. सलगर ,न्यायाधीश श्रीमती एस. एस पाखले, न्यायाधीश यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली. राष्ट्रीय लोकअदालतीस विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.विकास भोसले व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
या लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, गटविकास अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.
000000