*वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांना काण्व पुरस्कार प्रदान*

*वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांना काण्व पुरस्कार प्रदान*

 पंढरपूर :- 
  येथील श्रीकाण्व वेदपाठशाळा कुंडल तीर्थ पंढरपूरद्वारे दिला जाणारा वैदिक  काण्व पुरस्कार  यावर्षी सातारा येथील प्रसिद्ध वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांना वेदमूर्ती शंकर महाराज गलगलकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर काही निवडक विद्यार्थ्यांसह त्यांच्या स्वगृही या मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून वेद संरक्षण व वेद  संवर्धन कार्य करणाऱ्या वेदमूर्तीना हा पुरस्कार प्रतिवर्षी प्रदान केला जातो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाठशाळेचे प्रधानाध्यापक वेदमूर्ती शंकर महाराज गलगलकर यांनी केले. यावेळी त्यांनी पाठशाळेच्या कार्याबद्दलची सर्व माहिती सांगितली तर पुरस्काराला उत्तर देत असताना वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी विश्व रक्षणाचे व मानवी कल्याणाचे कार्य वेद सांगतात. त्याचे महत्त्व आज जगामध्ये सर्वांना पटत आहे. त्यानुसार जगातील अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये वेदाचा व वैदिक संस्कृतीचा अभ्यास व संशोधन मोठ्या प्रमाणात केले जात आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले. आभार श्री वैभव कुलकर्णी यांनी केले. यावेळी श्री प्रकाश जोशी, सतीश कुलकर्णी, गुंडोपंत कुलकर्णी, ओमकार वाटाणे, तसेच गोडबोले गुरुजी वेदपाठशाळेचे शिष्य इ. मान्यवर उपस्थित होते.