*सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या करणाऱ्या ,संतोष साळुंखे याच्या कुटूंबियांना संजय बाबा ननवरे यांनी केली आर्थिक मदत*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर अनिल नगर येथील सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या करणारा युवक संतोष साळुंके यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने व आई अपंग एक भाऊ भोळ साठ आहे ही परिस्थिती कळाल्यानंतर समाज सेवक संजय बाबा ननवरे संतोष साळुंके यांच्या घरच्यांच्या मदतीसाठी धावून गेले व त्यांना आर्थिक मदत व धान्याचे किट अशी मदत केल्याने सर्व स्तरातून संजय बाबा ननवरे त्यांचे कौतुक होत आहे तसेच पंढरपुरात अनेक ठिकाणी गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे म्हणून समाजसेवक संजय बाबा ननवरे यांना ओळखली जाते काही दिवसापूर्वी संजय बाबा ननवरे यांचे वडीलांचे निधन झाल्याने ती घरी असताना त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना तरीही गोरगरीब लहान मुले बाबांच्या घरी मदतीसाठी येत होते तेव्हा संजय बाबा ननवरे आपले दुःख बाजूला ठेवून गोरगरिबांच्या दुःखात सहभागी होत होते व त्यांना आर्थिक मदत ही करत होते समाजसेवक संजय बाबा ननवरे हे पंढरपुरात गोरगरिबांना अडचणीत असणाऱ्या लोकांना नेहमी मदतीला धावून जात असतात