*स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्ताने अक्षय वाडकर मित्रपरिवाराच्या वतीने भरगच्च कार्यक्रम सुरू* *चौथ्या दिवशी 185 जणांची नेत्र तपासणी ,तर 40जण शस्त्रक्रियेसाठी पात्र*

*स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्ताने अक्षय वाडकर मित्रपरिवाराच्या वतीने भरगच्च कार्यक्रम सुरू*  *चौथ्या दिवशी 185 जणांची नेत्र तपासणी ,तर 40जण शस्त्रक्रियेसाठी पात्र*

पंढरपूर/प्रतिनिधी
 स्व .सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त अक्षय वाडकर मित्र परिवाराच्या वतीने  प्रभाग क्रमांक6 च्या नागरिकांसाठी विविध सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज चौथ्या टप्प्यातील "मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा शुभारंभ युवक नेते प्रणव मालक परिचारक आणि युवक नेते ऋषी मालक परिचारक यांनी केला.

यावेळी परिसरातील १८५ लोकांची नेत्रातपासणी केली गेली आणि त्यातून ४० लोक मोतिबिंदू च्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.
 
    या जयंतीनिमित्त येथील अक्षय वाडकर मित्र परिवाराच्या वतीने जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली  आठवडाभर विविध सेवा देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 
   या कार्यक्रमामध्ये मंगळवार दिनांक12 ऑक्टोबरला  संत तुकाराम भवन शेजारी पश्चिम द्वार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी  प्रभाग6 येथे वृक्षारोपण करण्यात  आले.
    गुरुवार दि14 ऑक्टोबर रोजी बडवे गल्ली पश्चिम द्वार येते रक्त तपासणी, ब्लडप्रेशर,थायराईड,मधुमेह आदी आजाराची मोफत तपासणी करण्यात आली.


     
    रविवार दि 17 रोजी महिलांसाठी  विजापूर गल्ली येथील पांडुरंग भवन येथे भव्य सुपंत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
     सोमवारी18 रोजी जुनी माळी गल्ली येथील एकनाथ भवन मध्ये सकाळी10ते4 या वेळेत भव्य मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
 20 ऑक्टोबर रोजी सकाळी10ते4वाजेपर्यत 
 उमदे गल्ली येथील संत वामनभाऊ महाराज  मठ येथे  मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  वरील सर्व सेवा सप्ताह मधील सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन अक्षय वाडकर यांनी केले आहे.